हेल्पलाइनमध्ये पोहचला पती; म्हणाला – ‘मला खुप मारते पत्नी, कुठेही फोन केला तर तिला समजते; काय करू’

पाटणा : वृत्तसंस्था – बिहारची राजधानी पाटणाच्या महिला हेल्पलाइनमध्ये पुन्हा एकदा पत्नीच्या त्रासाला कंटाळलेला पती पोहचला. म्हणू लागला, माझी पत्नी मला खुप मारते…एखादं काम तिच्या मनासारखं झालं नाही तर असं करते. असं अनेक दिवसांपासून होत आहे. पत्नी शिकवत असल्याने आता माझी मुलं सुद्धा माझ्यावर लक्ष ठेवू लागली आहेत. ही कैफियत मंगळवारी महिला हेल्पलाइनमध्ये मंदिरी येथे राहणार्‍या तरूणाने कौन्सिलरकडे मांडली.

तरूणाच्या महितीनुसार, त्याची पत्नी प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीवरून संशय घेते. दिवसभर त्याच्यावर लक्ष सुद्धा ठेवते. आता तर त्याचा मोबाइल फोनसुद्धा हॅक करण्यात आला आहे. या फोनद्वारे तो कुठेही बोलला तर पत्नीला अगोदर समजते. महिला हेल्पलाइनमध्ये पोहचलेल्या पीडित पतीने म्हटले की, मी माझ्या पत्नीला खुप त्रासलो आहे. आता तर फोनवर कुठे बोलताही येत नाही. काय करू समजत नाही.

पत्नी म्हणाली, पतीचे अनेक महिलांशी संबंध
पतीची कैफियत ऐकल्यानंतर महिला हेल्पलाईनवाल्यांनी पत्नीची बाजू सुद्धा ऐकून घेतली. या महिलेने म्हटले की, तिचा पती रियल इस्टेटचे काम करतो. तिचे अनेक महिलांशी संबंध आहेत. मागील अनेक महिन्यांपासून तो माझ्याकडे लक्ष देत नाही. कधीही फोन केला तर तो बिझी लागतो. यामुळे मी सुद्धा पतीमुळे त्रस्त झाले आहे.

महिला हेल्पलाईनने दिली दहा दिवसांची वेळ
दोघांचे म्हणणे ऐकल्यानंतर हेल्पलाइनच्या अधिकार्‍यांनी पती-पत्नीला दहा दिवसांचा वेळ दिला आहे. असे यासाठी करण्यात आले, जेणेकरून ते आपसातील त्रास कमी करू शकतील. अधिकार्‍यांनुसार जर ठरलेल्या काळात समस्या संपली नाही तर पुढील कारवाई केली जाईल. पाटणाच्या महिला हेल्पलाइनमध्ये अशाप्रकारची प्रकरणे नेहमी येत असतात.