Assembly Election Bihar : देवेंद्र फडणवीस असतील बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपचे प्रभारी – सूत्र

पाटणा : वृत्त संस्था – बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या राजकीय धोरणात मोठा बदल होऊ शकतो. सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बिहार निवडणूकीचे प्रभारी बनवले जाऊ शकते. विधानसभा निवडणुकीदरम्यान ते पूर्णपणे सक्रिय राहतील. मिळालेल्या माहितीनुसार, सध्याचे बिहार प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासोबत मिळून फडणवीस काम करतील. गुरुवारी कोर कमिटीच्या बैठकीत सुद्धा ते सहभागी झाले होते. काही दिवसातच त्यांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते.

महाराष्ट्राचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बिहारमध्ये येत असल्याच्या वृत्तावर भाजपाचे वरिष्ठ नेते डॉ. सी. पी. ठाकुर यांनी म्हटले की, ते चांगले नेते आहेत आणि निवडणुकीत चांगले काम करतात. दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर जिल्हा निवडणूक पदाधिकारी, जिल्हाधिकारी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यांनी आपले काम सुरू केले आहे.

तर, निवडणूक आयोगाकडून कोरोना संकटात निवडणूक घेण्यासाठी सर्व प्रकारची सावधगिरी बाळगण्यासाठी तयारी केली जात आहे. आयोग बिहार निवडणुकीसाठी विस्तृत दिशा-निर्देश तयार करत आहे. यावेळी जे बूथ तयार केले जातील, त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन बंधनकारक असेल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like