‘हर गरीब-जरूरतमंद की आवाज हूं, हां मैं गिरिराज हूं’ नावाने भाजप नेत्याच्या जीवनावर चित्रपट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते गिरिराज सिंह यांनी बिहारमध्ये आलेल्या महापुरानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर खरमरीत टीका केली होती. त्यावेळी ते मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते. त्यानंतर ते पुन्हा आपल्या जीवनावरील चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. हिंदुत्वाचा चेहरा असलेल्या गिरिराज सिंह यांच्या जीवनावरील चित्रपटाचे नाव हे ‘हर गरीब-जरूरतमंद की आवाज हूं, हां मैं गिरिराज हूं’ असे आहे.

Giriraj Singh
आज या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. सर्व तांत्रिक गोष्टी पूर्ण झाल्यानंतर या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे काम सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या चित्रपटाचे निर्माते दिनकर भारद्वाज यांनी आपल्या फेसबुकवरून या पोस्टरचे अनावरण केले आहे.

गिरिराज सिंह यांना गरिबांचा आवाज दाखवण्यात आले आहे
फेसबुकवरच या चित्रपटातील कलाकारांच्या नावाची देखील घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमात प्रफुल्ल मिश्रा, अमीय कश्यप, शुभम भारद्वाज, गिरिराज सिंह, एमके विरेश, ओम प्रकाश भारद्वाज आणि पुट्टु या कलाकारांचा समावेश असून गिरिराज सिंह यांना या सिनेमात गरिबांचा आवाज दाखवण्यात आले आहे.

या सिनेमाविषयी बोलताना या सिनेमाचा नायक अमिय कश्यप याने म्हटले कि, गिरिराज सिंह यांच्यासारख्या राजकीय नेत्याच्या जीवनावर चित्रपटाची निर्मिती हि चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर त्यांच्या जीवनावरील चित्रपट पाहून तरुणांना प्रेरणा मिळणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले.

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह हे बिहारच्या बेगुसराय या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कन्हैया कुमार याचा साडेचार लाख मतांनी पराभव करत आपली ताकद दाखवली होती.

Visit : Policenama.com