पटणा पाण्यात बुडत होतं, ‘ही’ मॉडल पुरामध्ये करत होती फोटोशूट, झाली ‘ट्रोल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही दिवसांपासून पावसाने देशभरात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागात देखील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बिहारमध्ये देखील पावसाने मोठा धुमाकूळ घातला असून या पावसात एका मॉडेलने फोटोशूट केले आहे. पटना शहरात या मॉडेलने हे फोटोशूट केले असून सध्या सोशल मीडियावर याचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

डूब रहा पटना, मॉडल ने बाढ़ में हंसते हुए कराया फोटोशूट, हुईं ट्रोल

हे फोटोशूट करणारे फोटोग्राफर सौरव अनुराज यांनी याविषयी सांगितले कि, मॉडेल सध्या पावसामुळे झालेली अवस्था या फोटोंमधून दाखवत आहे. सोशल मीडियावर काही जण या फोटोंचे कौतुक करत असून काही जण यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील करत आहेत. या मॉडेलचे नाव अदिति सिंह असून ती पटनामध्ये शिक्षण घेत आहे.

डूब रहा पटना, मॉडल ने बाढ़ में हंसते हुए कराया फोटोशूट, हुईं ट्रोल

या फोटोंविषयी अधिक बोलताना फोटोग्राफर सौरव यांनी सांगितले कि, लोकांपर्यंत संदेश जाण्यासाठी हे फोटोशूट करण्यात आले आहे. बिहारमध्ये काहीही झाले तरी नागरिकांना फरक पडत नाही. मात्र काही नागरिकांनी हे फोटो पाहिल्यानंतर मदतीचे देखील हात पुढे केले असून काहीजणांनी यावर टीका देखील केली आहे.

डूब रहा पटना, मॉडल ने बाढ़ में हंसते हुए कराया फोटोशूट, हुईं ट्रोल

दरम्यान, संपूर्ण बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने धुमाकूळ घातला असून यामध्ये आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यावर उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना देखील करण्यात आल्या आहेत. तसेच हि नैसर्गिक स्थिती असून यावर आपण काहीही करू शकत नसल्याचे यावेळी नितीश कुमार यांनी म्हटले.

डूब रहा पटना, मॉडल ने बाढ़ में हंसते हुए कराया फोटोशूट, हुईं ट्रोल

Visit : Policenama.com