‘या’ जिल्ह्याच्या ‘कलेक्टर’चं विचित्र फर्मान – ‘कडाक्याच्या ‘थंडी’च्या दिवसात उन्हाळ्याच्या ‘सुट्टी’ची घोषणा’

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – सरकारी विभागांच्या आणि अधिकाऱ्यांच्या कामाचा नमुना पहायचा असेल तर तुम्ही बिहारच्या गोपालगंज येथे नक्कीच जाऊन या, ज्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी कडाक्याच्या थंडीत शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. डीएम असलेल्या अर्शद अजीज यांनी दिलेल्या या निर्णयामुळे त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

14 जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश
पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 14 जानेवारीपर्यंत शाळांपासून सुटका देण्यात आलेली आहे. याबाबतच्या नोटीसमध्ये स्पष्ट शब्दात लिहिले आहे की, डीएमने उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची घोषणा केली आहे. यावर अनेक शिक्षकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत, शिक्षक नेते आनंद मिश्रा म्हणाले की, शिक्षक संघ डीएमच्या कारनाम्यांविरोधात चौकशीची मागणी करत आहे. अशा अधिकाऱ्यांविरुद्ध सरकारने कारवाई केली पाहिजे, यामुळे शाळा व्यवस्थापन गोंधळलेलेच नाही तर शिक्षक व पालकांमध्येही गैरसमज आहेत.

या आधी देखील दिला आहे असा आदेश
या आधी देखील अशाच प्रकारची चूक करण्याचा प्रकार अर्शद अजीज यांनी केलेला आहे. गेल्या वेळेस त्यांनी शाळांना 2029 पर्यंत सुट्ट्या दिल्या होत्या.विशेष म्हणजे नोटीस प्राप्त व्यक्तींनी देखील याबाबत त्यांना काहीच सांगितले नाही. यानंतर डीएमला याबाबत सूचना दिली असल्याची माहिती एसपी मनोज तिवारी यांनी दिली.