अखेर प्रशांत किशोर आणि पवन वर्मांची जेडीयूतून ‘हाकालपट्टी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जनता दल (यू) पक्षातून प्रशांत किशोर आणि पवन वर्मा यांची हाकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाचे महासचिव आणि प्रवक्ते के.सी. त्यागी यांनी याबाबत माहिती दिली आहे. पक्ष शिस्त मोडणे आणि पक्षविरोधी करावाई केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीतून त्यांना मुक्त करण्यात आले आहे. मागील काही महिन्यांपासून प्रशांत किशोर यांनी वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यांचे हे वक्तव्य पक्षाच्या निर्णयाविरोधात असल्याचे त्यागी यांनी सांगितले. प्रशांत किशोर यांनी पक्ष अध्यक्ष नितीश कुमार यांच्या विरोधातही अपमानास्पद वक्तव्य केली होती असेही त्यांनी सांगितले.

पवन वर्मा यांनी दिल्ली निवडणूकीत भाजपसोबत असलेल्या युतीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. तर प्रशांत किशोर यांनी सीएए आणि एनआरसी आणि एनपीआर वरून ट्वीटद्वारे सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यामुळे ते चर्चेत आले होते. मंगळवारी पटणा येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये नितीश कुमार यांनी त्यांच्या ट्वीटरवरून प्रश्न उपस्थित केले होते.

मंगळवारी प्रशांत किशोर यांच्या बाबत नितीश कुमार यांनी म्हटले होते, गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरून प्रशांत किशोर यांना पक्षात घेतले होते. त्यावर प्रशांत किशोर यांनी ट्विट करून नितीश कुमार यांना फटकराले होते. मी जेडीयूमध्ये कसा प्रवेश केला याबाबत नितीश कुमार यांनी खोटे सांगितले आहे. ते ज्या रंगात रंगले आहेत त्याच रंगात मलाही रंगवायचा हा खूपच वाईट प्रयत्न होता. जर तुम्ही खरचं सांगत असाल तर कोण यावर विश्वास ठेवेल की अमित शहा यांनी सुचवलेल्या व्यक्तीचे तुम्ही ऐकत नाही, असे ट्विट प्रशांत किशोर यांनी केले.

फेसबुक पेज लाईक करा