पक्ष नेतृत्वाविना ‘आरजेडी’ची दुर्दशा ; पक्षातील नेते घेणार लालू प्रसाद यादव यांची भेट

पोलीसनामा ऑनलाइन टीम – लोकसभा निवडणूकीत दारुण झालेल्या पराभवामुळे लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी या पक्षाला पुन्हा उभे करण्यासाठी तारणहार मिळेनासा झालाय. तेजस्वी यादव याच्या अनुउपस्थित पक्षात खळबळ माजली आहे. लोकसभेत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर देखील तेजस्वी यादव यांनी पराभवाची जवाबदारी स्वीकारलेली दिसत नाही आणि आता आरजेडी नेतृत्वहीन होत चालला आहे. या कारणाने तीन मोठे नेता शनिवार चर्चा करण्यासाठी लालू प्रसाद यादव यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे.

आरजेडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रघुवंश प्रसाद सिंह, शिवानंद तिवारी, पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रामचंद्र पुर्वे हे नेते लालू प्रसाद यादव यांची भेट घेऊ शकतात.

लोकसभा निवडणूकीत झालेल्या पराभवानंतर पराभवाची कारणं शोधण्यासाठी 28 मे ला पक्षाने समीक्षा बैठक बोलवली होती. मात्र यात पराभवाची कोणतीही समिक्षा करण्यात आली नाही. याच कारणाने काही नेते लालू प्रसाद यादव यांची भेट घेऊन शकतात आणि त्यावेळी पक्ष नेतृत्वावर चर्चा करु शकतात असे सांगण्यात येत आहे.

निवडणूकीनंतर पराभवाची कारणे विचारल्यावर त्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत निवडणूक झालेल्या मतदानावरच शंका उपस्थित केली. त्यानंतर ते परत माध्यमांसमोर आलेच नाहीत. आरजेडीने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला देखील त्यांनी दांडी मारली. तेजप्रताप यादव यांनी मात्र उपस्थिती लावली.

एकीकडे इतर पक्ष 2021 ला होणाऱ्या विधानसभा निवडणूकीच्या तयारीला लागले असताना आरजेडीने अजून यावर चर्चा देखील केलेली नाही. तेजस्वी यादव यांच्या गैरहजेरीत आरजेडीतील वरिष्ठ नेत्यांना पुढील चिंता लागली आहे. नेतृत्वाच नसल्याने पराभवाने हीनलेल्या आरजेडीची वाईट अवस्था झाली आहे. 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like