महाराष्ट्रापेक्षा कमी Corona रूग्ण असलेल्या ‘या’ राज्यानं Lockdown बाबत घेतला मोठा निर्णय, 6 सप्टेंबरपर्यंत वाढवला लॉकडाऊन

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – बिहारमध्ये सध्या सुरू असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने 6 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी बिहार सरकारच्या क्राइसिस ग्रुप मॅनेजमेंट कमिटीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. याबाबत माहिती देताना गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आमिर सुभानी म्हणाले की, लॉकडाऊन राज्यात 6 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यावेळीही धार्मिक स्थळे बंद राहतील, असेही ते म्हणाले.

कंटेनमेंट झोनमध्ये काटेकोरपणे लॉकडाऊन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुभानी म्हणाले की, मागील आदेशात केले गेलेले उपाय या वेळीही सुरू राहतील. याबाबत बिहार सरकारच्या गृह विभागाने एक अधिसूचना जारी केली आहे.

6 सप्टेंबरपर्यंत काही अटींसह बिहारमध्ये दुकाने आणि बाजारपेठा उघडल्या जातील. बाजार उघडण्याची वेळ सकाळी 6 ते संध्याकाळी 6 असेल. गृहविभागाने लॉकडाऊनशी संबंधित आदेश जारी केला आहे. पूर्वीप्रमाणे या वेळी देखील शॉपिंग मॉल ते धर्मस्थळे लॉकडाउनमध्ये उघडणार नाही. रेस्टॉरंट्समध्ये फक्त होम डिलिव्हरी उपलब्ध असेल. बिहारमधील सर्व जिल्ह्यांत, खासगी कार्यालयातील केवळ 50 टक्के कर्मचारी येतील आणि राज्यात बस धावणार नाहीत, यामध्ये अत्यावश्यक सेवा असलेल्या कार्यालयाला सूट देण्यात आली आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने सर्व जिल्ह्यांचे डीएम आपल्या स्तरावरुन आदेश काढतील आणि त्या आधारे जिल्ह्यातील इतर भागातील दुकाने उघडली जातील. राज्यात बसगाड्यासारख्या सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू होणार नाहीत, त्याचबरोबर टॅक्सी आणि ऑटो रिक्षांवर बंदी घातली जाणार नाही. लॉकडाऊन दरम्यान धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालये, कोचिंग संस्था बंद राहतील. तसेच, उद्याने आणि व्यायामशाळांसारखे कुलुप पूर्वीप्रमाणेच लॉक राहतील. बिहारमध्ये कोरोना संक्रमणाचा टप्पा अजूनही सुरु आहे. ज्या राज्यात एक लाखाहून अधिक लोक या आजाराच्या विळख्यात आले आहेत. तेथे मृतांची संख्याही 500 च्या वर गेली आहे