पंतप्रधान मोदींबरोबर माझे संबंध उत्तम, परंतू ‘या’ मुद्यांना विरोध कायम : नितीश कुमार

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था  – लोकसभा निवडणूकांनंतर सरकार स्थापनेनंतर नितीश कुमार यांच्या एनडीएतील जेडीयूला लोकसभेत कोणतेही मंत्री पद न मिळाल्याने भाजप आणि जेडीयुमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जात होते. मात्र यावर खुद्द नितीश कुमार यांनीच खुलासा केला आहे की केेंद्रात कोणतेही मंत्रीपद न दिल्याने भाजपा-जेडीयु मध्ये कोणताही वाद नाही. पाटनात पत्रकारांशी बोलताना नितीश कुमार म्हणाले की मोदी आणि माझ्या पहिल्यासारखेच संबंध अजूनही आहे, आमच्या दोघातील संबंध खूप चांगले आहेत. नितीश कुमार यांनी सांगितले की निवडणूकांच्या प्रचारात माझ्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या परंतू मी शांत राहिलो. माझ्या शांत राहिल्याने जनतेने मतदानातून अगदी कठोर उत्तर दिले. मी निवडणूकीत जास्त न बोलण्याचा निर्धार केला होता. जो यशस्वी झाला.

विवादित मुद्यावर कायम –

नितीश कुमार यांनी सांगितले की आम्ही विवादित सिध्दांताबाबत कोणताही समझोता केलेला नाही. त्यामुळे जेडीयुचा विवादित मुद्यांवर संघर्ष सुरु राहिल. कलम 370, राम मंदिर हे वादाचे मुद्दे आहेत आणि त्याबाबतचे आमचे मत कायम आहे. त्यात कोणतीही तडजोड नाही. बिहारमधील लोकांनी कामाच्या मुद्यावर एनडीएला समर्थन दिले आहे. मंत्री मंडळात सहभागी होण्याबाबत कोणताही भ्रम निर्माण करण्याची गरज नाही आणि त्या बाबत आमच्यात कोणतीही नाराजी नाही. त्यांनी या मुद्यावर बरेच बोलण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्यांना नकार दिला आहे. त्यांनी असे ही स्पष्ट केले की आम्ही जेव्हा एनडीए मध्ये सहभागी झालो तेव्हाच आमच्याकडे सरकारमध्ये सहभाग होण्याचा प्रस्ताव आला होता.

पाण्याची समस्या –

बिहारमधील दुष्काळावर बोलताना ते म्हणाले की, बिहारमधील पाण्याचा स्तर खालावत चालला आहे. जी येणाऱ्या काळातील गंभीर समस्या असेल. बिहारमधील पाण्याच्या समस्येला दूर करणं हे एक मोठं आव्हान आहे. राज्यात मागील वर्षी कमी पाऊस झाला होता. परंतू पाण्याची समस्या दूर करण्यासाठी संबंधित मंत्रालयांना निर्देश देण्यात आले आहेत.

नितीश कुमार यांनी स्वत: मोदी आणि आपल्यातील संबंध एकदम उत्तम असल्याचे सांगितल्याने आणि सरकारमध्ये कोणतीही मंत्रीपद न मिळाल्याने आपण नाराज नाही असे सांगितल्याने आता या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. परंतू नितीश यांचा काही मुद्याला विरोध कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

बिहारमध्ये इन्सेफेलाइटिस आजाराने १९ मुलांचा मृत्यू

वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांच्या श्वसनविकारमध्ये वाढ

देहूत महिलांसाठी विनामूल्य कॅन्सर तपासणी

गर्भपाताची औषधे विकणाऱ्या ऑनलाईन पोर्टलविरोधात एफआरआय