माजी खासदार शहाबुद्दीन यांच्या निधनावर पुष्पम प्रिया चौधरीच्या ट्विटने उडाला गोंधळ

पाटणा : वृत्त संस्था – राजदचे माजी खासदार शहाबुद्दीन यांचे शनिवारी कोरोना संसर्गाने निधन झाले. तिहार जेल प्रशासनाने यास दुजोरा दिला आहे. त्यांना मागील महिन्यात 20 एप्रिलला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शहाबुद्दीन यांच्या निधनाच्या वृत्तानंतर बिहारमध्ये राजकीय शेरेबाजी दिसून येत आहे. शहाबुद्दीन यांच्या मृत्यूवर पुष्पम प्रिया चौधरीने सोशल मीडिया पोस्टद्वारे शाहबुद्दीन यांना हॅशटॅग करून कमेंट लिहिली आहे. ज्यानंतर राजकारण सुरू झाले आहे. पुष्पम प्रियाने बिहार निवडणुकीत स्वत:ला सीएम कँडिडेट घोषित केले होते.

Pushpam priya,

बिहारच्या राजकारणात उतरलेल्या पुष्पम प्रियाने सोशल मीडियावर शहाबुद्दीन यांचा हॅशटॅग करून एक पोस्ट शेयर केली आहे. पुष्पम प्रियाने लिहिले आहे की, आमच्या संपूर्ण पीढीने बाहेर बिहारींचे गुंड आणि क्रिमिनल होण्याचे आक्षेप सहन केले आहेत. आज जर मी याचे एक प्रतिक असलेल्या जेलमधील मृत्यवर खेद व्यक्त केला तर हा कोट्यवधी बिहारींचा अपमान होईल. मला कोणताही खेद नाही. फुल स्टॉप.

पुष्पम प्रिया चौधरीच्या ट्विटवर गोंधळ
शहाबुद्दीन यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत. लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्यने शहाबुद्दीन यांच्या मृत्यूवर ट्विट करत दु:ख व्यक्त केले. त्यांनी लिहिले – वडीलांचे सहकारी आणि समाजवादी नेते डॉ. शहाबुद्दीन साहेब यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:खी आहे. त्यांच्या आत्म्याला शांती आणि कुटुंबियांना धैर्यासाठी देवाकडे प्रार्थना करते.

शहाबुद्दीन यांच्याविरूद्ध तीन डझनपेक्षा जास्त गुन्हेगारी प्रकरणे सुरू आहेत. तिहार जेलमध्ये जाण्यापूर्वी ते बिहारच्या भागलपुर आणि सीवानच्या जेलमध्ये सुद्धा मोठ्या कालावधीपर्यंत होते. 2018 मध्ये जामीन मिळाल्यानंतर जेलच्या बाहेर आले, परंतु जामीन रद्द झाल्याने त्यांना पुन्हा जेलमध्ये जावे लागले होते. 15 फेब्रुवारी 2018 ला सुप्रीम कोर्टाने त्यांना सीवानहून तिहार जेलमध्ये आणण्याचा आदेश दिला होता.