एक नव्हे, 2 नाही तर तीन लग्न केली पठ्ठ्यानं, एकेदिवशी मुलानं पप्पा म्हणून हाक मारली अन्…

पटना : वृत्त संस्था – हौसेला मोल नाही ते खरंच आहे. या जगात प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी आहे. कोणाला काय आवडेल हे सांगता येत नाही. पण हे खरे आहे की प्रत्येकाला काही ना काही आवडत असते. आता हेच पहा ना एका व्यक्ती लग्न करण्याचा छंद आहे. पटनामध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. ज्याठिकाणी त्या व्यक्तीने खोटं बोलून आणि फसवणूक केली आणि अनेकांसोबत संबंध बनवले आहेत.

संजय कुमार पासवान हे पटनाच्या पोठही गावात राहतात. या पठ्ठ्याला लग्नाची इतकी हौस की त्याने आतापर्यंत ३ लग्न केली आहेत. आरोपी युवकाचं पहिलं लग्न काशीनगरच्या धनरूआ येथील बेबी देवीसोबत झालं. त्याला पहिल्या पत्नीपासून ३ मुलं आहेत. दुसरं लग्न ममता नावाच्या एका महिलेसोबत झालं. तिला एक मुलगा आहे. तर तिसरं लग्न पुष्पा कुमारी नावाच्या महिलेसोबत केले. हे तिन्ही लग्न खोटं बोलून आणि फसवणूक करून झालं. या तिन्ही पत्नींना वेगवेगळ्या ठिकाणी ठेऊन तो संसार करत होता याची कोणालाही चाहूल लागली नाही.

दरम्यान, तिसरी बायको पुष्पा कुमारी हिला नवऱ्याच्या काही हालचालींवर संशय निर्माण झाला आणि तिने त्याचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. पुष्पाने नवऱ्याचा पाठलाग केला आणि नवऱ्याचे बिंग फुटलं. पुष्पानं नवऱ्याला त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत रंगेहाथ पकडलं. प्रकरण वाढल्यानंतर पुष्पा कुमारीनं नवऱ्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता आरोपीनं ३ लग्न केल्याची माहिती पोलिसांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा आरोपी दुसरी बायको ममता देवीजवळ पोहचला तेव्हा तिसरी पत्नी पुष्पा कुमारी तिच्या मुलांसह त्याठिकाणी पोहचली. ममताचा मुलगा जेव्हा आरोपी संजयला ‘पप्पा’ बोलला तेव्हा पुष्पाकुमारीला मोठा धक्काच बसला.

पोलिसांनी आरोपीवर कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी संजयला अटक केली आहे. न्यायालयात आरोपीला हजर केले असता त्यांनी आरोपीला जेलमध्ये पाठवलं आहे. संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.