SSR Suicide Case : अ‍ॅम्ब्युलन्स चालकाने सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात केला खळबळजनक खुलासा !

पाटणा : वृत्त संस्था  – सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह घेऊन जाणार्‍या अ‍ॅम्ब्युलन्सचा चालक शहनवाज अब्दुल करीम याने दावा केला आहे की, त्यास परदेशी नंबरवरून धमकीचे कॉल येत आहेत. त्याला या प्रकरणात काहीही न बोलण्यास सांगितले जात आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर करीमच आपल्या सहकार्‍यांसह त्याच्या घरी पोहचला होता आणि मृतदेह कुपर हॉस्पिटलमध्ये आणला होता.

शहनवाजने दावा केला आहे की, जेव्हा तो बांद्राच्या फ्लॅटमध्ये पोहचला होता, तेव्हा सुशांतचा मृतदेह फासावर लटकलेला नव्हता, तर खाली उतरवण्यात आला होता. त्याच्या टीमनेच पांढर्‍या कपड्यात गुंडाळलेला सुशांतचा मृतदेह अ‍ॅम्ब्युलन्सपर्यंत नेला. याशिवाय शहनवाजने धक्कादायक दावा केला आहे की, सुशांतच्या मृतदेहाची छायाचित्रे मुंबई पोलिसांनीच सोशल मीडियावर अपलोड केली होती. अगोदर पोलिसांनी म्हटले की, नानावटी हॉस्पिटलला जायचे आहे, परंतु नंतर म्हटले की, मृतदेह कुपर हॉस्पिटलला घेऊन जायचे आहे.

अ‍ॅम्ब्युलन्स बदलण्याचे कारण हे होते
सुशांतच्या घरी दोन अ‍ॅम्ब्युलन्स पाठवल्यानंतर अ‍ॅम्ब्युलन्सचा मालक राहुलने सांगितले की, ज्या दिवशी सुशांतने सुसाईड केली होती, त्या दिवशी तो गावात होता. यामुळे त्याचा भाऊ अक्षय अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन सुशांतच्या घरी गेला. अक्षय जेव्हा सुशांतच्या घरी पोहचला तेव्हा त्याची बॉडी अगोरदरच खाली उतरवण्यात आली होती. अ‍ॅम्ब्युलन्स कर्मचार्‍यांनी त्याची बॉडी स्ट्रेचरवर ठेवून बिल्डिंगच्या खाली आणली. अ‍ॅम्ब्युलन्सची व्हीलचेयर नादुरूस्त झाल्याने त्या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये सुशांतची बॉडी फिट होत नव्हती. यासाठी राहुलने आपली दुसरी अ‍ॅम्ब्युलन्स बोलावली होती.

सालियानच्या मृत्यूचे रहस्य माहिती होते
सुशांतच्या एका मित्राने मीडियाला सांगितले की, सुशांतची माजी सेक्रेटरी दिशा सालियानचा मृत्यू 8 जूनला झाला होता. सुशांतला दिशाच्या मृत्यूचे रहस्य माहित होते. त्याला माहित होते की, तिचा मृत्यू कसा झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा सुद्धा तपास करत आहेत. बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडेय यांनी म्हटले होते की, सुशांतच्या मृत्यूचे सत्य जाणण्यासाठी दिशाच्या मृत्यूचे कोडे सुटणे आवश्यक आहे.