सुसाईड की मर्डर ? सुशांतच्या ‘डेथ मिस्ट्री’बद्दल सोशलवर ट्रेंड करतायेत ‘हे’ महत्त्वाचे 7 प्रश्न !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांत सिंह राजपूतला जाऊन 18 दिवस झाले आहेत. पोलीस तपासात अजूनही कोणती ठोस माहिती समोर आलेली नाही. सूत्रांच्या मते फॉरेन्सिक टीमनं अशी माहिती मिळवली आहे की, निधनाच्या दिवशी म्हणजेच 14 जूनच्या सकाळी 10.15 मिनिटांनी सुशांतनं त्याचं नाव Sushant Singh Rajput सर्च केलं होतं. असा दावा आहे की, त्यानं स्वत:शी संबंधित काही न्यूज आर्टीकल वाचले होते. असाही सवाल केला जात आहे की, एवढा फेमस अभिनेता स्वत:बद्दल का सर्च करत होता.

पोलिसांनी आतापर्यंत 29 लोकांची चौकशी केली आहे. त्यांना संशय होता हे सगळं षडयंत्र तर नाही ना. कारण अनेकांनी तसे संकेत दिले होते. अभिनेता शेखर सुमननं खुल्लमखुल्ला सांगितलं होतं की, सुशांत नेपोटीजम किंवा भाई जातिवादाला नाही तर गँगेजमला म्हणजेच गँगला बळी पडला आहे.

शेखर सुमन, बिहारमधील नेते तेजस्वी यादव यांच्यासह अनेक चाहत्यांनी आतापर्यंत सीबीआयचीचौकशीची मागणी केली आहे.

सीबीआय चौकशीची मागणी कणाऱ्या चाहत्यांनी सोशल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. सुशांतच्या डेथ मिस्ट्रीबद्दल विचारले जाणारे ते 7 प्रश्न कोणते आहेत ते पाहूयात.

1) पोलिसांसमोर अनेक चकित करणारे खुलासे झाले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सुशांतच्या आत्महत्येच्या आदल्या रात्रीच बिल्डींगमधील सर्व सीसीटीव्ही बंद होते. अखेर हे सीसीटीव्ही बंद कसे झाले ?

2) त्याच रात्री सुशांतचे काही मित्र त्याच्या फ्लॅटवर आले होते त्यांनी खूप आनंद लुटला. हुटींग केली. जो डिप्रेशनमध्ये आहे तो हुटींग का करेल. कारण ही तर आनंदाची निशाणी आहे ?

3) सुसाईडच्या 2 तास आधी तो फ्लॅटमधून बाहेर आला होता. त्याचा मूड चांगला होता. तो आसपासच्या लोकांना म्हटला की, आज गरमी खूप आहे ना. सुसाईडचा विचार करण्याला गरमीचा त्रास कसा होईल, तो यावर का विचार करेल ?

4) सुशांतच्या ज्या फ्लॅटमध्ये रहात होता त्याची डुप्लीकेट चावीही गायब आहे. ज्या कापडानं त्यानं फाशी घेतली त्यावर त्याच्या तीनच बोटांचे ठसे आहेत. जर त्यानं सुसाईड केलंय तर 3 बोटांचे ठसे कसे ?

5) हेदेखील एक न सुटलेलं कोडं आहे की, कापडावर ज्या बोटांचे ठसे आहेत ते डाव्या हाताचे आहे. सुशांत तर लेफ्टी नव्हताच. मग त्यानं फक्त डाव्या हातांच्या मदतीनं सुसाईड का केलं ?

6) गळफास घेऊ आत्महत्या केली तर डोळे मोठे होऊ बाहेर आल्सासारखे वाटतात. जीभ बाहेर येते. गळ्यावर U शेप बनतो. परंतु सुशांतच्या प्रकरणी मृतदेहाचे जे फोटो समोर आले आहेत त्यात असं काहीच दिसत नाही. असं का ?

7) सुशांतनं त्याच्या गर्लफ्रेंडला सांगितलं होतं की, तो तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहिला तर त्याला मारलं जाईल. परंतु त्याची ही मैत्रीण एका वजनदार चित्रपट निर्मात्याची खास होती आणि ते म्हणतात की, सुशांत सुसाईड करेल. असं कसं होऊ शकतं ?