खळबळजनक ! मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची गोळी झाडून हत्या, 2 दिवसांपूर्वीच केला होता पक्ष प्रवेश

पटना : वृत्तसंस्था –   बिहारची राजधानी पटनामध्ये भाजप जयंत मंडल उपाध्यक्ष राजेश कुमार झा उर्फ राजू बाबा यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. बैऊर ठाण्याअंतर्गत तेज प्रताप नगरमधील सीताराम उत्सव हॉल जवळ बाईकवर आलेल्या दोघांनी राजू बाबा यांच्यावर गोळी झाडली. भाजप नेता राजू बाबा यांचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना सकाळी 6 वाजता घडली. यावेळी राजू बाबा मॉर्निंग वॉकला गेले होते. पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल होती आणि प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. आसपासचे सीसीटीव्ही फूटेजही तपासले जात आहेत. दोन दिवसांपूर्वीच राजेश कुमार झा उर्फ राजू बाबा भाजपमध्ये सामील झाले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like