गर्लफ्रेन्डसह ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करणार्‍या पतीला पत्नीनं ‘रंगेहाथ’ पकडलं, पुन्हा भर रस्त्यातच…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. या दिवशी जिथे प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांसोबत जगण्या मरण्याची शपथ घेतात. त्याच वेळी, बिहारची राजधानी पटनामधील बेली रोडवरील खळबळजनक घटना घडली. एका महिलेने आपल्या पतीला त्याच्या प्रेयसीबरोबर दुचाकीवरून जात असताना रंगे हात पकडले. त्यानंतर रस्त्यावरच तमाशा सुरु झाला. रस्त्यावरील गोंधळ पाहून पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांची भांडणे मिटवली.

पोलिसांसमोर पत्नीने आपल्या पतीवर अनेक गंभीर आरोप केले. पत्नीने सांगितले कि, तीन वर्षांपूर्वी दोन्ही कुटुंबांनी धुमधडाक्यात त्यांचे लग्न लावून दिले. त्यांना दोन मुले आहेत, परंतु लग्नाच्या तीन वर्षानंतर नवऱ्यावर प्रेमाचे भूत चढले आणि तो सर्वकाही विसरला.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी व्हॅलेंटाईन डे निमित्त पती आमच्या पत्नी आणि मुलाला सोडून आपल्या प्रेयसीला घेऊन इको पार्क येथे जात होते. वाहतूक पोलिसांच्या सांगण्यावरून महिलेने पोलीस ठाणे गाठले, तेव्हा पतीची बोलती बंद झाली. तसेच त्याच्या मैत्रिणीलाही पोलिसांकडून विचारण्यात आलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. पत्नीच्या लेखी तक्रारीवरून या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. दोघा पती – पत्नीत जर सामंजस्य करार झाला नाही तर पतीविरूद्ध गुन्हा दाखल करून न्याय कलमांमध्ये कायदेशीर कारवाई केली जाईल.