राम मंदिरासाठी ‘ही’ संस्था देणार 10 कोटी, 2 कोटींचा पहिला हप्ता दिला

पाटणा : वृत्तसंस्था – राम मंदिर निर्मितीसाठी पाटणा स्टेशन रोडवरील महावीर न्यास बोर्डतर्फे हनुमान मंदिर ट्रस्टने १० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. आता राम मंदिर ट्रस्ट निर्माण झाला असल्याने ही घोषणा पूर्ण करणार असल्याची घोषणा महावीर मंदिर ट्रस्टचे सचिव किशोर कृणाल यांनी केली असून त्यातील पहिला हप्ता म्हणून २ कोटी रुपयांचा धनादेश घेऊन ते अयोध्याला रवाना झाले आहेत.

राम मंदिर उभारण्यातील अडथळे दूर झाल्यानंतर आता ही घोषणा पूर्ण करण्याची तयारी महावीर न्यास बोर्डाने सुरु केली आहे. अनेक वर्षाच्या संघर्षानंतर राम मंदिर उभारण्यास सुरुवात होत आहे. जर मंदिराची उभारणी एक वर्षभरात होणार असेल, तर ट्रस्ट एक वर्षभरात संपूर्ण १० कोटी रुपये राम मंदिर निर्माण न्यासाला देईल. असे किशोर कृणाल यांनी सांगितले.