स्वातंत्र्य दिन विशेष ! देशभक्तीवरील ‘ही’ गाणी ऐकल्यानंतर आठवते हुतात्म्यांचे ‘बलिदान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – १५ ऑगस्ट रोजी पूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. १९४७ साली याच दिवशी भारत स्वतंत्र झाला होता. हा दिवस भारतीयांसाठी खूपच महत्तवपूर्ण दिवस आहे. हेच कारण आहे की, सामान्यांपासून ते खास लोकांपर्यंत प्रत्येकजण स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा करत असतो. देशातील प्रत्येक ठिकाणी सिनेमातील गाणी वाजवली जातात. ही गाणी ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची भावना आणखी दृढ होताना दिसते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर देशाप्रति अभिमान पाहायला मिळतो.

https://youtu.be/DSJ1MMGi_IQ

बॉलिवूडबद्दल बोलायचे झाले तर बॉलिवूडमध्ये अनेक दशकांपासून देशभक्तीपर सिनेमे आणि गाणे बनताना दिसत आहेत. बॉलिवूडमधील गाण्यांबाबत बोलायचे झाले तर मेरा रंग दे बसंती चोला रंग दे… हे गाणं ऐकून तर देशासाठी मरण्याची इच्छा निर्माण होते. तर ऐ मेरे वतन के लोगो हे गाणं तर आजही देशवासियांना डोळ्यात पाणी आणायला भाग पाडतं. तर दिल दिया है जान भी देंगे हे गाणं ऐकून तर देशासाठी शहिद होण्याची भावना निर्माण होते. तर बॉर्डर सिनेमातील संदेशे आते है हे गाणं देशातील जवानांच्या शौर्याला अभिवादन करतं.

स्वातंत्र्य दिनी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. या दिवशी लहान मुलांमध्येही वेगळा उत्साह पाहायला मिळतो. अनेकजणांनी आपल्या छातीवर तिरंग्याचा ब्रॉच लावलेला असतो. जणू काही अभिमानाने छाती अजूनच फुगते.

https://youtu.be/vYBAi3IOttU

https://youtu.be/BQBidc3eHPY

आरोग्यविषयक वृत्त