स्वातंत्र्य दिन विशेष ! देशभक्तीपर ‘हे’ सिनेमे पाहून तुम्हाला वाटेल ‘गर्व’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – १५ ऑगस्ट रोजी पूर्ण हिंदुस्तानात स्वातंत्र्याचा आनंद साजरा करणार आहे. हा दिवस म्हणजे त्या वीरपुत्रांना आणि जवानांचा स्मरण्याचा दिवस असतो ज्यांनी भारत भूमीला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली होती. प्रत्येकजण या स्वातंत्र्य दिनाचा आनंद सेलिब्रेट करताना दिसतो. बॉलिवूडमध्येही असे अनेक सिनेमे आहेत जे पाहिल्यानंतर प्रत्येक देशवासियाला आपल्या भारत भूमीवर गर्व वाटतो. त्यांच्या अंगावर मुठभर मांस चढल्यासारखंच जणू त्यांना वाटत असतं.

आपण बॉलिवूडमधील त्या सिनेमांबद्दल जाणून घेणार आहोत जे देशभक्तीने भरपूर आहेत. हे असे काही सिनेमे आहेत जे पाहिल्यानंतर आजही आपल्या अंगावर शहारा येतो. इतकेच नाही तर या सिनेमांमुळे आपल्या अंगात एक वेगळीच देशभक्तीची भावना निर्माण होते. काही सिनेमांची नावे सांगायची झाली तर बॉर्डर, चक दे इंडिया, रंग दे बसंती, लक्ष्य अशा काही सिनेमांची नावे सांगता येतील. याशिवाय याच वर्षी रिलीज झालेला उरी द सर्जिकल स्ट्राईक हा सिनेमाही खूप हिट झाला.

देशातील शहर असो वा गाव, गल्ली असो वा मोहल्ला प्रत्येक ठिकाणी स्वातंत्र्य भलत्याच उत्साहात साजरा केला जातो. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामुळे अनेकांच्या प्रतिभेला वावही मिळतो.

देशातील प्रत्येक ठिकाणी सिनेमातील देशभक्तीवपर गाणी वाजवली जातात. ही गाणी ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची भावना आणखी दृढ होताना दिसते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर देशाप्रति अभिमान पाहायला मिळतो.

 

आरोग्यविषयक वृत्त

You might also like