Patteri Tiger Radhanagari Wildlife Sanctuary | राधानगरी अभयारण्यात पट्टेरी वाघाचे दर्शन ! कॅमेर्‍यामध्ये झाला कैद, तीन वर्षांनंतर पुन्हा दिसला

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन  – Patteri Tiger Radhanagari Wildlife Sanctuary | राधानगरी दाजीपूर अभयारण्यात वाघ असल्याचे अनेकदा सांगितले जात होते. मात्र, आता त्याचा पुरावा उपलब्ध झाला आहे. दाजीपूर अभयारण्यात लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेर्‍यामध्ये एक पूर्ण वाढ झालेला पट्टेरी वाघ कैद झाला आहे (Patteri Tiger Radhanagari Wildlife Sanctuary). त्यामुळे राधानगरी अभयारण्य वाघासाठी पुरक असल्याचे दिसून येत आहे. (Sahyadri Patteri Tiger Seen In Radhanagari Wildlife Sanctuary In Kolhapur)

राधानगरी अभयारण्यात जिल्हा नियोजन निधीतून १०० ट्रॅप कॅमेरा खरेदीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. हे ट्रॅप कॅमेरे दाजीपूर अभयारण्यात लावण्यात आले आहे. ११ एप्रिल २०२२ रोजी सर्व वन अधिकारी आणि कर्मचार्‍यांना ट्रॅप कॅमेर्‍याचे प्रशिक्षण देऊन निरीक्षण सुरु करण्यात आले होते. शनिवारी या ट्रॅप कॅमेर्‍यात एक पूर्ण वाढ झालेला पट्टेरी वाघ दिसून आला. यापूर्वी २०१९ मध्ये एकदा वाघाचे छायाचित्रण झाले होते. त्यानंतर मात्र या परिसरात वाघ असल्याचे कोणतेही लक्षण आढळून आले नव्हते.

spot photo

 

वाघाच्या अंगावर असलेले पट्टे हे विशिष्ट असतात व त्यामुळे वाघा वाघांमधील फरक शास्त्रीय पद्धतीने ओळखता येतो. राधानगरीतील वाघाचे पट्टे सॉफ्टवेअरवर टाकून त्याचे कर्नाटक व गोवा येथील वाघांशी जुळणी करण्याचा प्रयत्न केला जाईल. जर ते जुळले तर हा वाघ स्थलांतरीत होऊन आला आहे, असे समजले जाईल. जर ते जुळले नाही तर या वाघाचा जन्म राधानगरी अभयारण्यातच झाला असा निष्कर्ष काढण्यात येईल. त्यामुळे पुढील काही दिवसात हा वाघ नेमका कुठला आहे की राधानगरी अभयारण्यातीलच आहे, हे स्पष्ट होणार आहे.

Web Title : Patteri Tiger Radhanagari Wildlife Sanctuary | Patteri tiger sightings in Radhanagari Sanctuary! Captured on camera, reappeared three years later

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा