Paud Pune Crime News | पुणे : वाढदिवसाच्या ओल्या पार्टीतील मध्यस्थी पडली महाग ! टोळक्याने कोयत्याने वार करुन मित्राचा केला निर्घुण खून

Narhe Pune Crime News | Drunk husband stabbed to death; Incidents in Narhe
ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Paud Pune Crime News | वाढदिवसांच्या ओल्या पार्टीत (Birthday Party) मित्रांमध्ये भांडणे झाली होती. ही भांडणे मिटविण्यासाठी बोलविण्यात आले. यावेळी मित्राला मारु देणार नाही, असे म्हणणार्‍या व मध्यस्थी करणार्‍या मित्रावरच टोळक्याने कोयत्याने सपासप वार (Koyta Attack) करुन खून केला.

ओंकार भालचंद्र भिंगारे (वय २५, रा. उरवडे ता. मुळशी) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत आकाश शंकर येनपूरे (वय २८, रा. उरवडे, ता. मुळशी) यांनी पौड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गणेश भंडलकर, ओंकार जाधव, सनी चव्हाण, अक्षय शेलार, सचिन भंडलकर, किरण ओव्हाळ व त्यांचे दोन साथीदार यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मुळशी तालुक्यातील (Mulshi Taluka) घोटावडे ते कोळवण रोडवरील आमलेवाडी येथे रविवारी रात्री पावणे नऊ वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकर भिंगारे हा पूर्वी उरवडे गावी रहात होता. सध्या तो पिंपळे गुरव येथे राहतो. पूर्वी ते टाटा कंपनीत काम करत होते. फिर्यादी यांचा १८ ऑगस्ट रोजी वाढदिवस असल्याने त्यांनी उरवडे येथील फॉर्म हाऊसवर ओली पार्टी ठेवली होती. गणेश भंडलकर याचेसोबत अविनाश ऊर्फ चिलाप्या चोरगे याने मैत्री सोडली होती. याचा राग गणेश याच्या मनात होता. वाढदिवसाची पार्टी सुरु असताना अविनाश चोरगे आणि गणेश यांच्यामध्ये वाद झाला. त्यावेळी ओंकार भिंगारे हा मध्ये पडला होता. या पार्टीत भांडणे झाल्यापासून फिर्यादी व इतर जण गणेश याच्याशी बोलत नव्हते. त्याचा राग गणेशच्या मनात होता.

ही भांडणे मिटविण्यासाठी फिर्यादी व इतर आमलेवाडी येथे रात्री जमले होते. त्यावेळी गणेश हा ओंकार याला म्हणाला, मी अविनाशाला मारणार.
त्यावेळी ओंकार भिंगारे याने मी अविनाशला मारु देणार नाही म्हणाला.
दोघांमध्ये बाचाबाची सुरु असताना ओंकार जाधव पाठीमागील बाजूला गेला.
त्याच्याबरोबर ७ ते ८ जण आले. त्यांनी अविनाश व ओंकार यांना पकडून ठेवले.
कोयत्याने व लोखंडी रॉडने मारायला सुरुवात केली. ओंकार मेलो मेलो असे ओरडत पळू लागला.
फिर्यादी याने त्याला पकडून ठेवलेल्याला हिसका देऊन ओंकारला वाचविण्यासाठी धावला. तोपर्यंत टोळक्याने ओंकारवर सपासप वार केले. ओंकर निपचित पडल्याने तो मेला याची खात्री झाल्यावर गणेश भंडलकर याने ”चला रे ओंक्याचे काम झाले,” असा आवाज दिला. त्यानंतर ते सर्व जण दुचाकींवरुन निघून गेले. पौड पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक सुधीर कदम (PI Sudhir Kadam) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa

हे देखील वाचा

Narayan Rane On Uddhav Thackeray | दिशा सालियन प्रकरणी नारायण राणेंचा गौप्यस्फोट; म्हणाले – “उद्धव ठाकरेंनी मला फोन करून…”

Pune Metro News | पुणे : बुधवार पेठ, मंगळवार पेठ आणि नाशिक फाटा या तीन मेट्रो स्थानकांची नावे बदलण्यात येणार

Vanraj Andekar Murder | एनसी ते मर्डर : वनराज आंदेकर याच्या खूनाचा प्रवास

Total
0
Shares
Related Posts