AIADMK चे नेते पॉल पांडियन यांचे निधन

चेन्नई : वृत्त संस्था – एआयएडीएमकेचे नेते आणि तामिळनाडु विधानसेभेचे माजी सभापती पॉल हेक्टर पांडियान यांचे शनिवारी सकाळी चेन्नईतील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ७४ वर्षाचे होते. गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. पांडियन यांना गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये वेल्लोरच्या खिश्चत मेडिकल कॉलेजमध्ये ह्दयविकाराच्या आजाराने दाखल केले होते.

पंडियान यांनी १९७२ मध्ये एआयएडीएमकेमध्ये प्रवेश केला होता. ते १९८५ ते १९८७ च्या काळात तामिळनाडु विधानसभेचे सभापती होते. एम जी रामचंद्रन यांच्या निधनानंतरही तो दोन वर्षे सभापती होते. त्यांनी सुरुवातीला रामचंद्रन यांच्या पत्नी जानकी यांना साथ दिली होती. त्यानंतर ते जयललिता यांच्या पाठीशी उभे राहिले होते. ते जयललिता यांचे १९९६ ते १९९९ दरम्यान सल्लागार होते. ते चार वेळा आमदार राहिले असून एकदा खासदारही झाले होते.

जयललिता यांच्या मृत्युनंतर शशिकला यांना पार्टीचे सरचिटणीस करण्यास त्यांचा विरोध होता. त्यामुळेच त्यांनी जयललिता यांचा मृत्यु हा नैसर्गिक नसल्याचा आरोप करुन खळबळ उडवून दिली होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/