Paurashpur : सीरिजमध्ये ‘बोल्डनेस’च्या मर्यादा ओलांडणाऱ्या पौलोमी दासचा खुलासा ! म्हणाली- ‘सेटवर सतत मिलिंद सोमनला न्याहाळायचे…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्हीची क्वीन प्रोड्युसर एकता कपूर (Ekta Kapoor) ची इरोटीक वेब सीरिज पौरषपुर (Paurashpur) अल्ट बालाजी आणि झी 5 वर रिलीज केली जाणार आहे. डिसेंबर महिन्यात ही सीरिज रिलीज होणार आहे. नुकताच याचा टीजरही रिलीज झाला आहे. सर्वच कलाकार यात अनोख्या भूमिकेत आहेत. भाभीजी घर पर है फेम ॲक्ट्रेस शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) आणि पौलोमी दास (Poulomi Das) यांनी यात बोल्ड सीन्सच्या अनेक मर्यादा तोडल्या आहेत. अलीकडे पौलोमी हिनं एका मुलाखतीत काही खुलासे केले आहे. सेटवर ती मिलिंद सोमन (Milind Soman) ची खास वाट पहायची असं तिनं सांगितलं आहे.

पौलोमी मिलिंदबद्दल खूप पॅशनेट होती. मिलिंदच्या हॉटनेसवर फिदा ॲक्ट्रेसनं सांगितलं की, त्याला पाहायला ती तरसत असे. त्याच्यासोबत काम करणं स्वप्नापेक्षा काही कमी नव्हती असंही ती म्हणाली आहे.

ती म्हणते, त्यांचा वेगळाच चार्म आहे. ते सोबतच्या को अॅक्टरला एवढं कंफर्टेबल करतात की, काम करण्याची मजा दुप्पट होते.

या सीरिजमध्ये शिल्पा शिंदे, मिलिंद सोमन, शहीर शेख (वीर सिंह), साहिल सलाथिया (भानू), अन्नू कपूर (राजा भद्रप्रताप) पौलोमी दास (काला), आदित्य लाल (राजकुमार रणवीर) आणि अनंत विजय जोशी (राजकुमार आदित्य) हे कलाकार देखील दिसणार आहेत.