Paush purnima 2021 : पौष पौर्णिमेच्या महास्नानाला होत आहे ग्रहांचा अद्भूत संयोग

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पौष महिना सूर्यदेवाचा महिना मानला जातो. पौर्णिमेची तिथी चंद्र तिथी असते. सूर्य आणि चंद्राचा हा अद्भूत संयोग केवळ पौष पौर्णिमेलाच होतो. यासाठी या दिवशी केलेल्या उपासनेतून अनेक मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. एकीकडे ग्रहांची बाधा शांत होऊ शकते, तर दुसरीकडे मुक्ती आणि मोक्षाचे वरदानसुद्धा मिळू शकते. यावेळी पौर्णिमा 28 जानेवारीला आहे.

यावेळी पौष पौर्णिमेला ग्रहांचा संयोग
सूर्य, शनी, गुरू आणि शुक्राचा संयोग होईल. गुरु, मंगळ आणि चंद्राचा अद्भूत केंद्रीय संबंध कायम राहील. यामुळे अमृत वर्षा होईल आणि पवित्रता निर्माण होईल. या दिवशी दुर्लभ गुरुपुष्य नक्षत्र सुद्धा असेल. यावेळच्या स्नानातून मुक्ती आणि मोक्षाची शक्यता खुप जास्त असेल.

कशा प्रकारे कराल या दिवशी उपवास आणि स्नान ?
सकाळी स्नानापूर्वी संकल्प करा. अगोदर जल डोक्याला लावू नमस्कार करा. नंतर स्नानाला सुरूवात करा. स्नान केल्यानंतर सूर्याला अर्ध्य द्या. स्वच्छ कपडे परिधाम करा आणि मंत्र जप करा. मंत्र जपानंतर वस्तुंचे दान करा. या दिवशी पाणी आणि फळ ग्रहण करून उपवास करू शकता.

शुभ मुहूर्त
या दिवशी एखाद्या गरीब, गरजू व्यक्तीला भोजन देऊन दान-दक्षिणा द्या. दानात तीळ, गुऴ, चादर आणि लोकरीचे वस्त्र विशेष करून द्या. यावेळी पौर्णिमा तिथी 28 जानेवारी 2021 गुरुवारी 01:18 पासून सुरू होऊन 29 जानेवारी 2021 शुक्रवारी 12:47 पर्यंत राहिल.