विद्यार्थीनीसोबत ‘अश्लील’ चाळे करणारा शिक्षक चांगलाच ‘गोत्यात’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना मुंबईच्या पवई भागातील हिरानंदानी परिसरात घडली आहे. खासगी शिकवणीत विद्यार्थीनीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला गुरुवारी पवई पोलिसांनी अटक केली आहे. सचिन गुलाब हांडे (वय-42) असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

हिरानंदानी परिसरात पीडित 13 वर्षाची मुलगी राहते. याच परिसरात ती हांडे याच्याकडे खासगी शिकवणीला जात होती. 11 सप्टेंबर रोजी ती नेहमी प्रमाणे शिकवणीला गेली असता सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास आरोपी हांडे याने तिला केबीनमध्ये बोलावून घेतले. त्यावेळी तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या पीडित मुलीने त्याच्या तावडीतून आपली सुटका करून घेत रडत घरी गेली.

पीडित मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. संतापलेल्या आईने थेट पवई पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी सचिन हांडे विरुद्ध तक्रार दाखल केली. आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी हांडे विरुद्ध विनयभंग आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून हांडेला अटक केली. आत्तापर्य़ंत त्याने अनेक मुलींचा छळ केला होता. मात्र, मुलींनी त्याला घाबरून तक्रार दाखल केली नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like