निर्भया केस : फाशीच्या ठिकाणी ‘ही’ गोष्ट बोलायची होती पवन जल्लादला, पण…

नवी दिल्ली : वृत्त संस्था – तिहार जेलमध्ये फाशीचे लीव्हर खेचण्यापूर्वी 5 मिनिटासाठी पवन जल्लाद यांना काहीतरी बोलायचे होते. तेथे उभे असलेल्या अनेक अधिकार्‍यांद्वारे सरकारपर्यंत एक मेसेज त्यांना पाठवायचा होता. परंतु, सायबर कॅफे चालवणार्‍या त्यांच्या शेजार्‍याने त्यांना असे करू नये, असे सांगितले होते. स्वत: पवन यांनाही वाटले की, एवढ्या मोठ्या मुद्द्यावर असे केल्यास आपण अडचणीत येऊ शकतो. त्यांचा शेजारी दिव्यांशू याने सांगितले की, पवन जल्लाद आपली जात ढेह छाज बाबत अस्वस्थ आहेत.

हा आहे पवन जल्लाद यांच्या जातीचा मुद्दा

निर्भया गँग रेपशी संबंधित चारही गुन्हेगारांना फाशी देणारे पवन जल्लाद यांचे शेजारी दिव्यांशू यांनी मेरठमध्ये सांगितले की, पवन कुमार ढेह छाज जातीचे आहेत. परंतु त्यांची अडचण अशी आहे की, त्यांच्या जातीला एससीचा दर्जा मिळालेला नाही. यामुळे जेव्हा काही दिवसांपूर्वी नैसर्गिक आपत्तीत त्यांचे घर कोसळले, तेव्हा त्यांना कोणतीही सरकारी मदत मिळाली नाही. एवढेच नव्हे तर शाळा-कॉलेजात शिकणार्‍या त्यांच्या मुलांना कोणताही फायदा मिळाला नाही. यामुळे नाईलाजाने त्यांना दुसर्‍या जातीत सहभागी व्हावे लागेल.

राष्ट्रपती आणि पीएम-सीएम यांना लिहिले पत्र

सायबर कॅफे चालवणारे दिव्यांशू यांनी सांगितले की, जेव्हा पवन कुमार जल्लाद यांना मार्ग सूचला नाही तेव्हा त्यांनी प्रार्थना पत्राचा आधार घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पीएम नरेंद्र मोदी, यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ आणि दूसर्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांना एक पत्र लिहिले. पत्रात ढेह छाज जातीला एससी दर्जा आणि लाभ देण्याची मागणी केली आहे. परंतु, अजूनपर्यंत पत्राचे उत्तर आलेले नाही.

पीएम मोदींच्या या अभियानाने प्रभावित आहेत पवन जल्लाद

पवन जल्लाद यांनी म्हटले की, पीएम मोदी यांनी बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ अभियान सुरू केले आहे. या अभियानातून मुलींना खुप मदत मिळाली आहे. आता मुलींबाबत काहीही असले तरी त्यावर ताबडतोब सुनावणी होते. आता लोकांना समजू लागले आहे की, मुलगी वाचवली तर आपला समाजही सुरक्षित राहील. निर्भया केसमधील दोषींबाबत पवन यांनी म्हटले की, एका मुलीसोबत वाईट कृत्य करणार्‍यांना फाशी देऊन मला वाटेल की, पंतप्रधान मोदी यांचे अभियान बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ मध्ये एक पाऊल चालण्याची मलाही एक संधी मिळाली.