सलग तिस-या वर्षी पवना धरणातील गाळ काढण्याचे काम सुरु

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड शहरासह एमआयडीसी, तळेगांव, देहूरोड आणि मावळातील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करणा-या पवना धरणातील पाणीसाठा वाढविण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी गाळ काढण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी ठरला आहे. दोन वर्षात धरणातून ७५ हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला असून त्यामुळे धरणात ४५ दिवस पुरेल, इतका अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. जल संवर्धनाच्या दृष्टीन सुरू केलेल्या या कामात खासदार श्रीरंग बारणे यांनी सातत्य ठेवले असून सलग तिस-या वर्षी गाळ काढण्याच्या कामाची सुरुवात  गुरुवारी  (१० मे) पवना धरण भागात केली.

खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते तिस-या वर्षी गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी पाट बंधारे विभागाचे उपअभियंता नानासाहेब मटकरी,शाखा अधिकारी मनोहर खाडे, मंडल अधिकारी बलकवडे, तालुका प्रमुख राजु खांडभोर, भारत ठाकुर, महिला संघटिका आशाताई देशमुख, युवा सेना अधिकारी अनिकेत घुले, विभाग प्रमुख अमित कुंभार, चंद्रकांत भोते, देहुरोड शहर प्रमुख महेश धुमाळ,वाहतुक सेना महेश केदारी, सरपंच उमेश दहिभाते, उपसरपंच संदिप झांबरे व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहर पवना धरणाच्या पाण्यावर अवलंबुन असुन पवना धरणातील पाण्याचा वापर पिंपरी-चिंचवड शहराला १०० टक्के पाणीपुरवठा करण्यासाठी केला जातो.पिंपरी चिंचवड महानगरपालिका ४९० एम. एल.डी व एम.आय.डी.सी १०० एम.एल.डी पाणी धरणातून उचलते. पिंपरी-चिंचवड बरोबर तळेगांव, देहूरोड,शहर व शहराबाहेरील उद्योग आणि मावळमधील शेतक-यांना पवना धरणातून पाणीपुरवठा  केला जातो. उद्भवणारी पाणी टंचाई टाळण्यासाठी आणि पाणी साठा वाढवण्यासाठी या पवना धरणामध्ये गेल्या ५० वर्षांपासून साठलेला गाळ काढणे आवश्यक होते. खासदार बारणे यांनी या संदर्भात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना पत्रव्यवहार केला. परंतु, पाट बंधारे विभाग आणि महापालिका यांच्यात हद्द व कार्यक्षेत्राच्या वादात हे काम सुरू होऊ शकले नाही. अखेर खासदार बारणे यांनी पुढाकार घेत खासदार स्थानिक विकास निधीतून हे काम सुरू करण्याचा निश्चय केला.

गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने खासदार बारणे यांनी स्वतः लक्ष घालून स्वतंत्र यंत्रणा उभी करून व स्थानिक शेतकऱ्यांच्या सहकार्याने धरणातील हा गाळ काढण्यास सुरुवात केली. तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. तसेच महसूल विभाग आणि पाटबंधारे विभाग आणि शिवसेनेच्या मावळातील पदाधिका–यांची मदत मिळाली. त्यातून तीन वर्षे निरंतर हे काम सुरू आहे. दोन वर्षात धरणातून ७५ हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला असून धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला. धरणात ४५ दिवस पुरेल, इतका अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे. कोणत्याही सरकारी यंत्रनेने तो गाळ काढण्याचे धाडस केले नाही, परंतु खासदार श्रीरंग बारणे यांनी यासाठी पुढाकार घेतला. याचा फायदा पिंपरी चिंचवड शहर,तळेगांव, देहूरोड या शहरांना बरोबर स्थानिक शेतकऱ्यांना देखील झाला आहे.

या संदर्भात खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, “पिपंरी-चिंचवड शहराला  २०१६ मध्ये दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागला होता. तर, गेल्यावर्षी एकवेळ पाणीपुरवठा होता. या वर्षी तशी पाणीटंचाई भासत नाही. त्यावरून धरणातील गाळ काढल्याचा फायदा झाला आहे. या प्रक्रियेमुळे अधिकचे पाणी उपलब्ध झाले आहे. त्याबरोबर पवना नदीवर शिवणे व गहुंजे येथे दोन केटीवेअर बंधारे बांधण्यासाठी खासदार बारणे यांनी पुढाकार घेतला. गाळ काढण्याचे काम महानगरपालिकेचे असताना ते आपण हाती घेतले. गेली दोन वर्षे सातत्याने धरण भागात झाडे लावण्याची, तसेच त्या ठिकाणी दगडी गँबीन वॉल तयार करण्याची मागणी महानगरपालिकेकडे केली आहे. त्यातून धरणात वाहून येणारा गाळ कमी होईल. परंतु, या संदर्भात महानगरपालिकेने अजून कुठलीही कार्यवाही केली”. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मदतीविना स्वतंत्र यत्रणा उभीकरूण पवना धरणातील गाळ काढण्याची प्रक्रिया तिन वर्ष राबवत असल्याने पिंपरी चिंचवड शहराला पाणी टंचाई भासत नसल्याचे बारणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हणाले आहे.