निर्भया केस : फाशीची प्रक्रिया जवळपास पूर्ण, कडकोट बंदोबस्तात तिहारला येणार पवन जल्लाद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भयाचे आरोपी आपली फाशी टाळण्यासाठी एकेक करत कायद्यातील डावपेच वापरत आहेत. परंतु त्यांना फासावर लटकवणाऱ्यानं फाशी देण्याची पूर्ण तयारी केली आहे. निर्भयाचे दोषी सुप्रीम कोर्टाच्या दारावर दयेची आस लावून आहेत. तिहार जेल प्रशासनानं मेरठच्या पवन जल्लादला आणण्याची पूर्ण तयारी केली आहे. बुधवार सुप्रीम कोर्ट चार दोषींपैकी एक असणाऱ्या मुकेशच्या याचिकेवर निर्णय देणार आहे. गुरुवारी पवन जल्लाद दिल्लीत पोहोचतील.

जर आता पूर्ण झालेल्या कायदेशीर प्रक्रियेत जर काही बदल झाला नाही तर 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता चारही दोषींना फासावर लटवकलं जाईल. निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यासाठी उत्तर प्रदेश कारागृह महानिदेशालयानं पवनच्या नावार शिक्कामोर्तब केलं आहे. गुरुवारी सकाळी पवनला तिहारमध्ये आणलं जाईल. इथे येऊन ते फाशीची ट्रायल करतील.

फाशी घरातील सर्व तयारीची खात्री

तिहार जेलचे महासंचालक संदीप गोयल म्हणाले, “गुरुवारी सकाळी पवन जल्लादला मेरठहून तिहारमध्ये आणलं जाईल. सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता त्यांना कुठे ठेवलं जाईल हे मात्र सांगता येणार नाही. हे तर निश्चित आहे की, दिल्लीत पोहोचताच पवन यांना फाशीघरात आणलं जाईल. जेणे करून त्यांना खात्री पटेल की दोषींना फाशी देण्यासाठी फाशी घरात बंदोबस्त झाला आहे आणि सर्वकाही ठिक आहे.”

पवन जल्लादला तिहारमध्ये आणताना 15 ते 20 शस्त्र पोलीस (दिल्ली पोलीस थर्ड कॉर्प्सचे कर्मचारी) असतील.” अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

फेसबुक पेज लाईक करा