राम गोपाल वर्मांच्या ऑफिसवर दगडफेक करत साऊथ ‘सुपरस्टार’ पवन कल्याणच्या चाहत्यांचा तुफान राडा ! जाणून घ्या प्रकरण

पोलीसनामा ऑनलाईन टीम : साऊथ सुपरस्टार पवन कल्याण याच्या आयुष्यावर सिनेमा तयार केल्यानं राम गोपाल वर्मा पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. पवन कल्याणच्या या सिनेमावरून त्याचे चाहते वर्मांवर भडकले आणि त्यांनी तुफान राडा घातला आहे. वर्मांच्या ऑफिसवर दगडफेक केल्या प्रकरणी पोलिसांकडून आता 6 जणांना अटक करण्यात आली आहे. वर्मांनी ज्युबली हिल्स पोलिसांकडे याची तक्रार केली होती.

या घनटेनंतर राम गोपाल वर्मा यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. या सिनेमानंतर मला सतत धमक्या येत आहेत. तसं मला धमक्यांची आणि त्या वातावरणात राहण्याची सवय आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. राम गोपाल वर्मांनी ट्विटमध्ये असंही सांगितलं आहे की, त्यांनी हल्ला करून माझ्या पावर स्टार सिनेमाला अजून लोकप्रियता मिळवून दिली आहे. सध्या वर्मांचं हे ट्विट सोशलवर व्हायरल होत आहे. अनेकांनी कमेंट करत यावर प्रतिक्रिया देखील दिली आहे.

पवन कल्याण याच्या आयुष्यावर जो सिनेमा बनवला आहे त्याचं नाव पावर स्टार आहे. या सिनेमात पवन कल्याणचं आयुष्य चुकीच्या पद्धतीनं दाखवलं गेलं आहे असा चाहत्यांचा आरोप आहे. म्हणून सिनेमा पाहिल्यानंतर चाहते चांगलेच भडकले आहेत. त्यांनी चक्क राम गोपाल वर्मांच्या ऑफिसवरच हल्ला केला आहे.