Video : ‘वकील साब’च्या ट्रेलर रिलीजवर ‘हंगामा’, चाहत्यांनी तोडला थिएटरचा दरवाजा

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  साऊथ स्टार पवन कल्याणचा ‘वकिल साब’ या चित्रपटाचा ट्रेलर 29 मार्चला संध्याकाळी चार वाजता रिलीज करण्यात आला, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, आता या ट्रेलरमुळे अनेक ठिकाणी गदारोळ निर्माण झाला होता. पवनचे चाहते त्याला पडद्यावर पाहण्यासाठी उतावळे होते, त्यामुळे दक्षिणेतील काही चित्रपटगृहांमध्ये चेंगराचेंगरी झाली. विशाखापट्टणमच्या संगम सारथ थिएटरमध्ये चाहत्यांनी तोडफोड देखील केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कुठे तोडफोड तर कुठे फटाके

संगम सारथ थिएटरमध्ये 2 वाजपासूनच चाहत्यांची गर्दी जमली होती. थिएटरमध्ये जाण्यासाठी गर्दत धक्का- बुक्की सुरु होती. यावेळी गर्दीने थिएटरचा काचेचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. केवळ चित्रपटगृहातच नव्हे तर रस्त्यावर आणि घरांमध्येही वकील साबमध्ये पवन कल्याणची वापसी पाहण्यासाठी चाहते उत्साहाने भरले होते. कुठे रस्त्यावर फटाके फुटले तर कुठे अभिनेत्याच्या फोटोची आरती करण्यात आली. दोन वर्षांनंतर अभिनेत्याच्या पुनरागमनाने चाहत्यांमध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण केले.

दरम्यान, चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलयाचे झाल्यास यात पवन कल्याण व्यतिरिक्त प्रकाश राज, निवेदिता थॉमस, अंजली, अनन्या नागाला, नरेश, देव गिल भूमिका साकारत आहेत. या चित्रपटात श्रुती हासनने एक कॅमिओ अ‍ॅपिरन्स दिला आहे. 9 एप्रिल रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

पिंकचा रिमेक वकील साब

वेणू श्रीराम दिग्दर्शित वकील साब,हा हिंदी हिट चित्रपट ‘पिंक’ चा ऑफिशियल तेलुगु रीमेक असून तो दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरी निर्मित आहे. अमिताभ बच्चन यांनी पिंकमध्ये वकीलाची भूमिका साकारली होती, तर आता या रीमेकमध्ये पवन कल्याण एका वकीलाच्या भूमिकेत दिसणार आहे. यातही चित्रपटाची कथा सुमारे तीन महिला पात्रांनी तयार केली गेली आहे. पवन कल्याण एका वकीलाच्या भूमिकेत असून तो तीन मुलींच्या न्यायासाठी लढा देत आहे. त्याचवेळी प्रकाश राज आरोपी मुलांबद्दलचा खटला लढत आहे. हा कोर्ट रूम ड्रामा पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.