Pawan Singh | भोजपुरी सुपरस्टार पवन सिंहच्या अडचणींमध्ये मोठी वाढ; पत्नीने केले गंभीर आरोप

पोलीसनामा ऑनलाईन : 2008 मध्ये गाजलेले गाणे म्हणजे ‘लॉलीपॉप लागेलू’ हे गाणे आठवताच तोंडात नाव येते ते म्हणजे भोजपुरी सुपरस्टार (Bhojpuri Actor) पवन सिंह यांचे. सध्या मात्र काही कारणाने पवन सिंह (Pawan Singh) सोशल मीडियावर वायरल होत आहे. पवन सिंह त्याच्या पत्नीपासून घटस्फोट (Divorce) घेत असल्याच्या बातम्या चर्चेत असतानाच आता अजून एक मोठी बातमी समोर आली आहे. पवन सिंह याची पत्नी ज्योती सिंह (Jyoti Singh) यांनी त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. ज्योतीने पवन सिंहवर मानसिक छळ (Mental Torture) केल्याचा आरोप केला आहे.
पवन सिंह हा एक शेतकरी कुटुंबातील आहे. त्याचे वडील शेतकरी तर आई गृहिणी आहे. 1997 मध्ये त्यांनी ‘ओढणीया वाली’ या गाण्यापासून स्वतःच्या करिअरला सुरुवात केली होती. त्यावेळी त्याला एवढी प्रसिद्धी मिळाली नाही मात्र 2008 मध्ये आलेल्या गाण्याने तो प्रकाश झोतात आला.
आता मात्र त्याच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर (Serious-Allegations-By-Wife) आरोप करत पोलिसात तक्रार केली आहे. या तक्रारीमध्ये ज्योतीने सांगितले की लग्नानंतर लगेचच त्याच्या आईने आणि बहिणीने तिला मानसिक
छळ देण्यास सुरू केले. एवढेच नाही तर मामाकडून 50 लाख रुपये देखील हडप केले होते.
ती गरोदर असताना इतर औषध देऊन तिचा गर्भपात (Abortion) देखील केल्याचा आरोप ज्योतीने यावेळी केला.
ज्योतीने केलेल्या अर्जावर पवन सिंह यांना 5 नोव्हेंबरला न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
Web Title :- Pawan Singh | bhojpuri actor pawan singh serious allegations by wife
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
BJP MLA Nitesh Rane | ‘हिंदू म्हणून वाकड्या नजरेने पाहिलं तर त्याचा…’, आमदार नितेश राणेंचा इशारा
Pune Crime | कोंढवा येथील लॅविटेट आणि द ब्रेक रुम हॉटेलमधील हुक्का बारवर गुन्हे शाखेचा छापा