पवना नदीतून एमसीएला दिले जाणारे पाणी बेकायदेशीर :उच्च न्यायालय

मुंबई :

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन(एमसीए) च्या गहुंजे स्टेडियमला पवना नदीतून मिळणारे पाणी बेकायदीशीर असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. यामुळे सिंचन विभागाकडून मिळणारे पाणी मुंबई उच्च न्यायालयाने रोखले आहे. यामुळे आता एमसीए च्या अडचणीत वाढ होणार आहे.

पवना धरणातून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला दिवसाला अडीच लाख लीटर पाण्याचा पुरवठा होतो. दुष्काळादरम्यान महाराष्ट्रात होणार्‍या आयपीएल सामन्यांसाठी पाणी पुरवठा करण्याला विरोध करत ’लोकसत्ता मूव्हमेंट’ या सेवाभावी संस्थेने हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती.

दरम्यान ,पुण्यात गहुंजे स्टेडियमवर होणार्‍या आयपीएल सामन्यांसाठी राज्य सरकारनं पाणी देऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेले आहेत. औद्यगिक वापरासाठी असलेले पाणी क्रिकेट स्टेडियमसाठी कसे वापरले जाते? असा सवाल हायकोर्टाने उपस्थित केला होता.