पवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पुरंदर तालुक्यातील 27 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – पुरंदर तालुक्यातील ७० टक्के पेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक, आर्थिक अडचण होऊ नये, म्हणून पवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २७ विद्याथ्यांना ५ लाख ५६ हजार ३०८ रुपयांची शिष्यवृत्ती धनादेशाद्वारे देण्यात आली असल्याची माहिती माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी दिली.

सासवड ( ता . पुरंदर) येथे पवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे धनादेशांचे वाटप संभाजी झेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी झेंडे बोलत होते. या वेळी पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष चेतन जाधव, सुदामराव इंगळे, हेमंत माहूरकर, बापूसाहेब कटके, प्रकाश कड, सुनील धिवार, बंडूकाका जगताप, अरुणआप्पा जगताप राहुल गिरमे, श्यामकांत भिंताडे, ईश्वर बागमार, प्रकाश फरतडे राजेश चव्हाण उपस्थित होते. रोहित पवार यांच्या माध्यमातून तालुक्यात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यात १४ हजार लोकांनी लाभ घेतला. युवक – युवती – महिला सक्षमीकरणासाठी त्यांच्या माध्यमातून सातत्याने मदत केली जात असल्याचे माणिकराव झेंडे पाटील यांनी सांगितले. ग्रामीण भागात आर्थिक परिस्थितीमुळे विद्याथ्यांना मधूनच शिक्षण सोडून जावे लागते. ही अडचण लक्षात घेऊन विद्यार्थी शिकला पाहिजे. यासाठी ट्रस्टचा उपक्रम स्तुत्य असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हेमंत माहुरकर यांनी सांगितले.

Visit :  Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like