बारामतीत पवार कुटुंबाची उद्या बैठक होणार, राजकीय नेत्यांचे बैठकीकडे लक्ष

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नाराज पार्थ पवार विषयी उद्या पवार कुटुंबीयांची बारामतीत एकत्रित बैठक होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे या बैठकीत  काय होणार ? आणि या बैठकीवरून राजकारणात काही अमुलाग्रह बदल होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार यांच्यावर सार्वजनिकरित्या आक्रमक टीका केली होती. यावरून पार्थ पवार नाराज होते. याच मुद्दयावर महाराष्ट्राच्या राजकारणात मागील दोन दिवसांपासून अधिक चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादी पक्षाच्या भूमिकेविरुद्ध मत मांडत असलेल्या पार्थ यांना शरद पवार यांनी चांगलेच खडेबोल सुनावले होते. यावरून बापलेक अर्थात अजित पवार आणि पार्थ पवार नाराज असल्याचे समजत होते. साहजिकच याचा परिणाम पक्षासोबतच पवार कुटुंबावरही झालाय. आता हाच वाद आता सोडवण्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येऊन चर्चा करणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

अजित पवारांचे कुटुंबीय शनिवार आणि रविवारी बारामतीमध्ये एकत्र भेटणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अजित पवारांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांच्या बारामतीच्या घरी पार्थसंबंधी पवार कुटुंबियांची एकञित बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होणार? आणि या सगळ्याबाबत अजित पवार नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

विधानसभेच्या वेळी देखील श्रीनिवास पवार यांच्या मध्यस्थीने अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये समेट घडवून आणला होता. त्यामुळे याही वेळेला पवार कुटुंबात पार्थवरून निर्माण झालेला तिढा श्रीनिवास पवार हेच सोडवणार का? असा प्रश्न इथे उपस्थित होत आहे. पवार कुटुंबाच्या या एकूण वादात संपूर्ण कुटुंब हे पुन्हा पहिल्यांदा एकत्र येणार आहे.

मुलगा पार्थ पवारच्या राजकीय भूमिकेवरून राष्ट्रवादीत रणकंदन सुरू आहे, त्यामुळे पुण्यात मात्र अजित पवार यांच्याकडून दैनंदिन बैठकांचा धडका सुरू आहे. पुणे कोरोना संदर्भातची साप्ताहिक आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते सर्किट हाऊसला गेले. पण, मीडियाचे कॅमेरे असल्याने त्यांनी मागच्या दाराने माध्यमांना चकवा देऊन गेले. तिथं पीएमपीची बैठक तसेच पक्ष पदाधिकारी त्यांना भेटत होते.

तसेच घरात काही झालं नाही अशा अर्विभावात अजित पवारांनी दिवसभर बैठका आणि भेटीगाठीचं सत्र सुरू ठेवलं. तर, दुसरीकडे पार्थ पवार मुंबईहून पुण्याकडे निघाल्याचे सांगितलं जात होतं. आता उद्या होणार्‍या पवार कुटुंबीयांच्या बैठकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. यावरूनच राजकीय समीकरणं काय असतील? याचा अंदाज लावता येणार आहे.