PM मोदी – पवार भेटीबद्दल बाहेर आलं ते ‘अर्धसत्य’ : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान मोदींनी मला तुमच्यासोबत काम करायला आवडेल, तसेच सुप्रिया सुळे यांच्यासारख्या नेत्या केंद्रात चांगली जबादारी घेऊ शकतात’ अशी ऑफर भेटीदरम्यान  पंतप्रधान मोदींनी दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत दिली होती. मात्र ही माहिती अर्धसत्य असल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेतेपदाची धुरा हाती घेतल्यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच गेल्या महिन्याभरातील राज्यातील सत्तानाट्यावर भाष्य केलं आहे. शरद पवार यांनी दिलेल्या माहितीविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की , ‘त्या बैठकीला मी नव्हतो. त्यामुळे मी त्याबद्दल आत्ता भाष्य करणार नाही. पण तिथे काय झालं याची मला माहिती आहे. योग्य वेळी योग्य व्यासपीठावर मी त्याबद्दल बोलेन. मात्र  शरद पवार यांनी दिलेली माहिती अर्धसत्य  आहे. या भेटीबद्दल शरद पवार यांनी सांगितलं ती पूर्ण माहिती नाही. त्याआधी आणि नंतर काय बोलणं झालं हे कुणाला माहिती नाही. ‘

महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात सत्ता स्थापनेविषयी चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची  भेट झाली होती. त्यामुळं राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला होता.

Visit : Policenama.com