नितीन गडकरींविरूध्द पवारांना लढवावे : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुढील पंतप्रधान म्हणून नितीन गडकरी यांच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. तर आरएसएसच्या विरोधात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार किंवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी निवडणूक लढवावी असे खोचक विधान वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

नागपूर येथे रवी भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. भाजप आणि संघ कडवे हिंदुत्ववादी आहेत तर काँग्रेस देखील सौम्य हिंदुत्ववादी बनली आहे. काँग्रेस आणि भाजप यांचा अजेंडा एकच आहे. कारण काँग्रेसने गेल्या निवडणुकीला राहुल गांधी हे जानवेधारी आहेत हे लोकांना सांगितले असा जळजळीत टोला प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाला एकत्रित लगावला आहे.

काँग्रेस संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याच्या आमच्या भूमिकेवर बोलत नाही. जागा वाटत हा विषय गौण असला तरी काँग्रेस आघाडी आमच्या सोबत संवाद ठेवत नाही. म्हणून नाइलाजाने आम्हाला १ मार्च पर्यंत आमचे सर्व उमेदवार जाहीर करावे लागतील असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

Loading...
You might also like