नोकरदारांसाठी अत्यंत महत्वाची बातमी ! इन्कम टॅक्सचा नवा नियम, ‘या’ 2 गोष्टींची माहिती नाही दिली तर होणार पगारात ‘कपात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर आपण देखील दरवर्षी २.५ लाख रुपये किंवा त्याहून अधिक कमाई करत असाल आणि आपण नियोक्ता (Employer) ला पॅन आणि आधार क्रमांक (Pan and Aadhaar Details) चा तपशील प्रदान केला नसेल तर आपल्याला त्रास होऊ शकणार आहे. प्राप्तिकर विभागा (Departement of Tax) च्या नियमानुसार जर एखादा कर्मचारी आपल्या नियोक्ताला पॅन आणि आधार क्रमांक देत नसेल तर २० टक्के TDS (Tax deducted at source) त्याच्या पगारामधून वजा केला जाणार आहे.

का आणण्यात आला हा नियम

हा नियम केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळा (CBDT) ने बनविला आहे, जो की १६ जानेवारीपासून लागू करण्यात आला आहे. हा नियम ज्यांना वार्षिक २.५ लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक उत्पन्न मिळते त्यांना लागू करण्यात येणार आहे. टीडीएस देयकेवर लक्ष ठेवण्याबरोबरच या विभागातील महसुलातही वाढ होईल, असे देखील सांगण्यात येत आहे. आर्थिक वर्ष २०१८-२०१९ मध्ये एकूण प्रत्यक्ष कर संकलना (Direct Tax Collection) पैकी ३७ टक्के वाटा या विभागातून आला होता.

८६ पानांच्या परिपत्रकात देण्यात आली माहिती

CBDT ने यासाठी ८६ पानांचे परिपत्रक देखील जारी केले आहे. त्यामध्ये सांगण्यात आले आहे की कर्मचाऱ्यांना आयकर कायद्याच्या कलम २०६-AA अंतर्गत आपल्या नियोक्त्यास पॅन आणि आधार क्रमांक देणे बंधनकारक आहे. परिपत्रकात असेही म्हटले आहे की जर एखादा कर्मचारी या दोन्ही माहिती देत नसेल तर नियोक्ता एकतर त्यांच्या वार्षिक पगारातून कर कपात करू शकतो किंवा वार्षिक पगारामधून २०% वजा करू शकतो.

कशी केली जाईल गणना

जर आपले उत्पन्न वर्षाकाठी अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे तर आपल्या पगारामधून कोणताही कर वजा केला जाणार नाही. सर्व प्रकारच्या कपातीनंतर जर तुमच्या पगारावर २० टक्के कर लागू होत असेल तर २० टक्के इतका टीडीएस लागू केला जाईल. त्याचप्रमाणे, जर आपल्या पगारावर ३० टक्के कर लागू होत असेल तर नियोक्ता सरासरी कर कमी करेल. एकूण वार्षिक उत्पन्नाचे विभाजन करून हा एकूण कर आपल्या एकूण कर देयकामधून काढला जाणार आहे. परंतु कर्मचाऱ्यांना जर अधिक कर भरावा लागत असेल तर त्यांना शिक्षण व आरोग्य यांमध्ये ४ टक्के सवलत दिली जाऊ शकते.

काय आहेत नियम?

सीबीडीटीने सांगितले की पॅन आणि आधार कार्ड नसल्यामुळे क्रेडिट जारी करण्यास अडचण होते. अशा परिस्थितीत कर कमी करणार्‍यास टीडीएसच्या निवेदनात आधार आणि पॅनची माहिती देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like