FASTag लेनमध्येही द्यावा लागू शकतो डबल टोल टॅक्स, लागू झाला ‘हा’ नियम

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जरी आपल्या कारवर FASTag लावले असेल, तरी आपल्याला राष्ट्रीय महामार्गाच्या टोल प्लाझावर डबल कर भरावा लागू शकतो. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या नवीन अधिसूचनेनुसार, जर कारवरील फास्टॅग योग्यरित्या कार्य करत नसेल किंवा शिल्लक नसेल तर आणि तो टोल प्लाझाच्या फास्टॅग लेनमध्ये गेला तर तुम्हाला डबल टॅक्स आकारला जाईल. सरकारने यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे, जी 15 मे 2020 पासून देशभर लागू झाली आहे. यापूर्वी वापरकर्त्यास फास्टॅग लेनमध्ये प्रवेश न करता वाहनांसाठी डबल टोल टॅक्स भरावा लागला होता.

राष्ट्रीय महामार्गाच्या टोल प्लाझावर लांबलचक ओळीनंपासून मुक्त होण्यासाठी इलेक्ट्रॉनिक टोल यंत्रणा 15 डिसेंबर 2019 रोजी लागू करण्यात आली. दरम्यान, फास्टॅग उपलब्ध नसल्यामुळे, हे अनिवार्य करण्यासाठी 15 जानेवारी 2020 आणि त्यांनतर 15 फेब्रुवारी 2020 आणि काही भागात 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली. त्याअंतर्गत आपल्या कारवर फास्टॅग नसल्यास आणि चुकून या लेनमध्ये प्रवेश केल्यास टोल कर दुप्पट देण्याची तरतूद करण्यात आली.

1 कोटीहून अधिक FASTag जारी
डिसेंबर, 2019 पासून, एक कोटीहून अधिक FASTag रिलीझ केले गेले आहे. त्यापैकी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये 30 लाख फास्टॅग जारी करण्यात आले असून दररोज 1.52 ते 2 लाख फास्टॅगची विक्री होत आहे. त्याअंतर्गत जानेवारी 2020 मध्ये भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने (एनएचएआय) फास्टॅग लेनमध्ये प्रवेश करणाऱ्या 18 लाख डिफॉल्टर्सकडून 20 कोटी रुपये वसूल केले. नॅशनल हायवेच्या टोल प्लाझावरील फास्टॅग लेनमध्ये हे लोक विना फास्टॅग घुसले.