Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा; अजित वाडेकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी, क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी संघांनी उद्घाटनाचा दिवस गाजवला !!

पुणे : क्रिक् चॅलेंजर्स तर्फे आयोजित ‘पे फेअर करंडक’ (Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament) अजिंक्यपद १३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत अजित वाडेकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी (Ajit Wadekar Cricket Academy) आणि क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी (Cricket Next Academy) या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उद्घाटनाचा दिवस गाजवला. (Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament)

येवलेवाडी येथील बापूसाहेब शेलार क्रिकेट (ब्रिलीयन्ट् स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी) मैदानावर झालेल्या सामन्यात अलंकार पारवे याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर अजित वाडेकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीने गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना अजित वाडेकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीने १४४ धावा धावफलकावर लावल्या. यामध्ये शौर्य कोंडे (२९ धावा), रणवीर पांगारे (२० धावा) आणि अलंकार पारवे (नाबाद २७ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. सामन्यामध्ये पावसाचा व्यत्यय आल्यामुळे गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमीला १४ षटकात ८८ धावांचे असे सुधारीत लक्ष्य देण्यात आले होते. पण गॅरी संघाचा डाव ७० धावांवर मर्यादित राहीला.

शर्वण देसाई याच्या नाबाद ७३ धावांच्या जोरावर क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीने ३० यार्डस् क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ८ गडी राखून सहज पराभव केला. ३० यार्डस् क्रिकेट अ‍ॅकॅडमीने पहिल्यांदा फलंदाजी करताना १२८ धावांचे लक्ष्य उभे केले. हे आव्हान क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीने १६.५ षटकात व २ गडी गमावून पूर्ण केले. शर्वण देसाई याने ५१ चेंडूत १४ चौकारांसह नाबाद ७३ धावांची खेळी केली. त्याला विवान देशमुख (२४ धावा) आणि अर्णव पाटील (११ धावा) यांनी सुरेख साथ दिली आणि संघाला सहज विजय मिळवून दिला. (Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament)

स्पर्धेचे उद्घाटन एमसीए रणजी करंडक स्पर्धेचे निवड समितीचे माजी अध्यक्ष कैसर फक्की, उद्योजक स्वप्निल शेलार, अर्थव पॅटसनचे संचालक रमेश पाटील, कोटक महिंद्राचे उपाध्यक्ष बिक्रमजीत सेन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे संचालक नितीन सामल आणि नंदकिशोर कुमावत तसेच सहभागी संघाचे प्रशिक्षक आणि पालक उपस्थित होते.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
अजित वाडेकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २३ षटकात ७ गडी बाद १४४ धावा (शौर्य कोंडे २९, रणवीर पांगारे २०,
अलंकार पारवे नाबाद २७ (१२, ४ चौकार, १ षटकार), समर्थ ढेबे २-१९, शर्विल शेवाळे २-२६) डीएलएस मेथडनुसार
वि.वि. गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १४ षटकात ८ गडी बाद ७० धावा (अर्जुन चटाके १४, साहील कांबळे १२,
अर्थव पारवे २-२४); सामनावीरः अलंकार पारवे;

३० यार्डस् क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ९ गडी बाद १२८ धावा (श्रेय असलेकर ३३, विहान सुतार २१,
तनिश जैन ३-२१, शौर्य देशमुख २-१३) पराभूत वि. क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीः १६.५ षटकात २ गडी बाद १३२ धावा
(शर्वण देसाई नाबाद ७३ (५१, १४ चौकार), विवान देशमुख २४, अर्णव पाटील ११, ओजस अल्तेकर १-१५);
(भागिदारीः पहिल्या गड्यासाठी शर्वण आणि अर्णव ६४ (४६); दुसर्‍या गड्यासाठी शर्वण आणि विवान यांच्यात
५५ (५०); सामनावीरः शर्वण देसाई;

Web Title :- Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘Pay Fair Trophy’ Championship Under 13 Boys Cricket Tournament; Ajit Wadekar Cricket Academy, Cricket Next Academy teams celebrated the opening day !!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा 

Maharashtra Tax Practitioners’ Association | करसल्लागार यांच्या योगदानामुळे करप्रणालीमध्ये सुसूत्रता; अ‍ॅड. पंकज घिया यांचे मत

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणीकंद पोलिस स्टेशन – भाड्याने जागा घेण्याचा बहाणा करुन बनावट खरेदीखत करुन ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

Maharashtra and Goa Bar Council e- filing facility | महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या ई-फाईलिंग आणि सुविधा केंद्रांचे उद्घाटन ! राज्यातील न्यायालयांचे कामकाज मराठीतून व्हावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Senior Journalist Digambar Darade | वरिष्ठ पत्रकार दिगंबर दराडे लिखीत ‘ऋषी सुनक’ ठरतेय ‘बेस्ट सेलर’