Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद 13 वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा ! 30 यार्डस् क्रिकेट अ‍ॅकॅडमी, ए.के. स्पोर्टस् अ‍ॅकॅडमी संघांची विजयी कामगिरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | क्रिक् चॅलेंजर्स तर्फे आयोजित ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत ३० यार्डस् क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि ए.के. स्पोर्टस् अ‍ॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी कामगिरी केली. (Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament)

येवलेवाडी येथील बापूसाहेब शेलार क्रिकेट (ब्रिलीयन्ट् स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी) मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत विहान सुतार याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ३० यार्डस् क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा १४ धावांनी पराभव करून पहिल्या विजयासह गुणांचे खाते उघडले. पहिल्यांदा फलंदाजी करताना ३० यार्डस् क्रिकेट अ‍ॅकॅडमीने २४ षटकामध्ये १२३ धावांचे आव्हान उभे केले. स्वराज शेलार याने ५८ चेंडूत ९ चौकारांसह ५५ धावांची खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव १०९ धावांवर मर्यादित राहीला. अर्जुन दिद्दी (४१ धावा) आणि अर्जुन चाटके (२२ धावा) यांची खेळी संघाचा पराभव वाचवू शकली नाही. विहान सुतार याने २३ धावात ३ गडी बाद करून विजयात मोलाचा वाटा उचलला. (Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament)

पृथ्वाराज खांडवे याच्या कामगिरीच्या जोरावर एके स्पोर्टस् संघाने अजित वाडेकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ९ गडी राखून पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. पहिल्यांदा फलंदाजी करताना अजित वाडेकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीने १५० धावा धावफलकावर लावल्या. शौर्य कोंडे याने ५६ धावांची खेळी करून संघाच्या डावाला आकार दिला. हे आव्हान ए.के. स्पोर्टस् संघाने १९.३ षटकात व १ गडी गमावून पूर्ण केले. पृथ्वीराज खांडवे याने ५९ धावांची तर, राजवीर देशमुख याने नाबाद ६० धावांची खेळी केली. या दोघांनी १०५ चेंडूत १२८ धावांची सलामी देत संघाच्या विजयाचा पाया रचत संघाला सहज विजय मिळवून दिला.

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः

३० यार्डस् क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २४ षटकात १० गडी बाद १२३ धावा (स्वराज शेलार ५५ (५८, ९ चौकार), वीरेंद्र पी. १७, ओजस अल्त्तेकर १०, मानस कुलकर्णी ३-३०, कुलवंश वाकोडे ३-२६) वि.वि. गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २५ षटकात ८ गडी बाद १०९ धावा (अर्जुन दिद्दी ४१, अर्जुन चाटके २२, विहान सुतार ३-२३); सामनावीरः विहान सुतार;

अजित वाडेकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ९ गडी बाद १५० धावा (शौर्य कोंडे ५६ (४८, ९ चौकार),
अलंकार पारवे २८, पृथ्वीराज खांडवे ३-१४) पराभूत वि. ए.के. स्पोर्टस्ः १९.३ षटकात १ गडी बाद १५३ धावा
(पृथ्वीराज खांडवे ५९ (५१, ११ चौकार), राजवीर देशमुख नाबाद ६० (५९, ९ चौकार), अर्थव अखाडे नाबाद १६);
(भागिदारीः पहिल्या गड्यासाठी पृथ्वीराज आणि राजवीर यांच्यात १२८ (१०५); सामनावीरः पृथ्वीराज खांडवे;

 

Web Title :-  Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘Pay Fair Trophy’ Championship Under 13 Children’s
Cricket Tournament! 30 Yards Cricket Academy, A.K. Winning performance of Sports Academy teams

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Solapur Pune Highway Accident | दुचाकीवरून ट्रिपल सिट निघालेल्या 3 मित्रांचा अपघातात मृत्यू, सोलापुर-पुणे महामार्गावरील घटना

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 7 हजार रूपयाची लाच घेताना सहाय्यक पोलिस निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Nandurbar News | नंदुरबार, शहादा शहरांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी वेळेत खर्च करावा -पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Maharashtra Politics News | राज्यात 11 मे नंतर नवं सरकार स्थापन होणार? राजकीय तज्ज्ञांचा दावा

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच : मोबाईल कंपनीची फसवणूक करणार्‍या टोळीस गुन्हे शाखेकडून अटक