‘ट्राय’ चा केबल चालकांना दणका, जेवढे मनोरंजन त्याचेच पैसे भरा 

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून तुमच्या आवडत्या मालिकेतल्या नायिका चित्रपटातील तुमचे आवडते नायक काही वाहिन्यांच्या पॅकेजबाबत संगत आहेत. यापूर्वी तुम्ही पाहत नसलेल्या चॅनल चे पैसे देखील तुम्हाला मोजावे लागत होते.तसेच त्यांनी ठरविलेल्या पॅकेजमध्ये आपल्याला हवे असलेले चॅनेल नसल्याने तो चॅनेल घेण्यासाठी आणखी पैसे द्यावे लागत होते. मात्र आता ट्रायने नवा नियम काढून ग्राहकांना फायदा करून दिला आहे. ट्रायच्या या नव्या कायद्याचा फटका मात्र केबल सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांना बसत आहे.

आपल्याला जे चॅनेल पाहायचे आहेत त्याच चॅनलसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. यामुळे अतिरिक्त पॅकेज घेण्याचे किमान १०० ते १५० रुपये वाचणार आहेत.डीटीएच सेवा पुरविणाऱ्या कंपन्या आतापासूनच ग्राहकांमध्ये संभ्रम पसरवत आहेत, असा आरोप ट्रायचे प्रमुख आर एस शर्मा यांनी केला आहे. तर टाटा स्काय, एअरटेलसह काही कंपन्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत १० जानेवारीपर्यंच मुभा मागितली आहे. यामुळे १ जानेवारी पासून नवीन नियम लागू होण्याची शक्यता कमी आहे.

काय आहे गणित 
केबल ऑपरेटर सरासरी २०० रुपये आकारतात. यामध्ये ते ३५० टीव्ही चॅनेल्स दाखविण्याचा दावा करतात. मात्र, यापैकी आपल्या घरामध्ये १० ते १५ चॅनेलच पाहिले जातात. तसेच डीटीएच ऑपरेटरचे आहे. त्यांनी ठरवलेले पॅकेज असे असते की त्यामध्ये पसंतीचे सर्व चॅनेल मिळत नाहीत. यामुळे त्या चॅनलसाठी नवीन अॅड ऑन चॅनल किंवा पॅक घ्यावे लागते. हा अतिरिक्त खर्च आता बंद होणार आहे.
नव्या नियमांनुसार केबल किंवा डीटीएच पुरवठादारांकडून आपल्याला हवे असलेले चॅनेल निवडता येणार आहेत. सध्या एखादा स्पोर्टचा चॅनेल घ्यायचा झाल्यास महिन्याला ४० ते ५० रुपये मोजावे लागतात. मात्र, हाच चॅनेल १ ते १९ रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. महत्वाचे म्हणजे यापुढे कंपन्या सांगतिल ते चॅनेल नाहीत, तर आपल्याला हवेत तेच चॅनेल घेता येणार आहेत. म्हणजेच ग्राहक राजा असणारआहे.
https://www.trai.gov.in/sites/default/files/PayChannels18122018_0.pdf  या लिंकवर तुम्ही चॅनेलचे 2017 चे दर पाहू शकता. 
बेस पॅकची किंमत 
यामध्ये दूरदर्शनचे २७ फ्री-टू एअर चॅनल असणार आहे. शिवाय अन्य श्रेणींमधील प्रत्येकी ५ चॅनल असतील. १३० रुपयांमध्ये १०० चॅनल आणि त्यावर १८ टक्के जीएसटी जमा केल्यास १५४ रुपये मोजावे लागतील. या चॅनलमध्ये कदाचित तुम्हाला हवे असलेले मराठी, हिंदी, इंग्रजी सिनेमा, बातम्या, मालिकांचे चॅनेलही असतील. नसल्यास १ रुपये ते १९ रुपये मोजून ते चॅनल अॅड करावे लागतील. किंवा एखाद्या चॅनेल कंपनीचे पॅकेज हवे असल्यास तेही कमी किंमतीत घेता येईल.कार्टून चॅनल पोगो पाहण्यासाठी सध्या २५ ते ३० रुपये महिना मोजावे लागतात. नवीन टेरिफमध्ये ४. २५ रुपये असतील.
स्टार स्पोर्ट चॅनलसाठी ६० ते ७५ रुपये मोजावे लागतात. नवीन टेरिफमध्ये 19 रुपये मोजावे लागतील.
एचडी पाहणाऱ्यांचा भारही  कमी 
एचडी चॅनेल पाहणाऱ्यांनाही हा निर्णय फायद्याचा आहे. एचडी चॅनेलचे पॅकेज १७५ ते २०० रुपये आहे. मात्र, एचडी सोबत तेच चॅनेल साध्या व्हर्जनमध्येही दिसतात. यामुळे एचडी वापरणाऱ्यांना विनाकारण साध्या चॅनलचेही पैसे आकारले जातात. सहाजिकच आहे, एचडी पॅकेज घेणारे एचडी चॅनेलच पाहणार. त्यामुळे हा अतिरिक्त भारही कमी होणार आहे.