नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – फार पूर्वी केवळ टपालाची देवाणघेवाण करणा-या टपाल खात्याने आता खऱ्या अर्थाने परिवर्तन घडून आली आहे. रिकरिंग, सुकन्या समृद्धी, खात्यातील पीपीएफ या योजनेत पैसे भरण्यासाठी आता टपाल कार्यालयात जाण्याची गरज नाही. विभागातर्फे आता ‘आयपीपीबी’त (इंडियन पोस्ट पेमेन्ट बँक) खाते खोला आणि घरूनच पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कोरोना काळात टपाल बँकेत तब्बल ३८ हजार खाती
आजपर्यंत नाशिक विभागात नवीन खातेदारांनी एप्रिलपासून तब्बल ३८ हजार टपाल बँकेत खाती उघडली. खात्याच्या बँकींगलाही मोठा प्रतिसाद दिला आहे. कोणत्याही टपाल कार्यालयात यासाठी फक्त शंभर रूपये भरून इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत खाते काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. फक्त आधारनंबर, मोबाईल क्रमांकासह जवळच्या टपाल कार्यालयात भेट देऊन हे खाते उघडता येते. संबंधित ग्राहक आपल्या खात्यातील शिल्लक फोनद्वारे टपाल बँकेतही माहिती करून घेऊ शकतात.
टपाल बँकेद्वारे मिळणा-या सुविधा
– हाताळण्यास सहज, सोपे अन सुलभ
– यात अकांऊंट नंबर लक्षात ठेवण्याची चिंता नाही.
– मोफत त्रैमासिक अकाऊंट स्टेटमेंट उपलब्ध.
– रिकरिंग डिपॉझिटसह पीपीएफ व अन्य पैसे भरण्याची सुविधा.
– आरटीजीएस, एनईएफटी, युपीआयद्वारे पैसे ट्रान्सफरची सुविधा.
– सर्व प्रकारची बिले, एलआयसी प्रिमियम घरूनच भरता येणार.