आता ‘या’ अ‍ॅपद्वारे क्रेडिट कार्डनं भरा घरभाडं; मिळेल 2000 रुपयांचा कॅशबॅक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   सामान्यत: लोक क्रेडिट कार्ड (Credit Card) ने खरेदी, रिचार्ज आणि बिल पेमेंट, रेल्वे आणि फ्लाइट तिकीट बुकिंग, ऑनलाइन पेमेंट करत असतात. तसेच आपणास हेदेखील माहीत असावे की, आपण क्रेडिट कार्डद्वारे घराचे भाडेदेखील देऊ शकता. क्रेडिट कार्डने भाडे देणे सहसा शक्य नसते, कारण तुमचा घर मालक मर्चंटप्रमाणे पेमेंट गेटवे वापरत नाही. परंतु आज मार्केटमध्ये क्रेड (CRED), नो ब्रोकर (Nobroker), पेझाप (Payzapp), रेड जिराफ (RedGirraffe) सारखे अनेक मोबाइल अ‍ॅप्लिकेशन्स आहेत, ज्याद्वारे तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे तुमचे रेंट देऊ शकता.

तथापि या अ‍ॅपवर थोड्याफार प्रमाणात सेवा शुल्क लागते, परंतु आपल्याला कॅशबॅक किंवा रिवॉर्ड पॉइंट्सदेखील मिळतात. त्याच वेळी, क्रेड अ‍ॅप आजकाल मार्केटमध्ये खूप लोकप्रिय आहे, ज्याद्वारे तुम्ही क्रेडिट कार्ड जोडून सहजपणे भाडे देऊ शकता.

काय आहे ऑफर

आजकाल क्रेड अ‍ॅपवर एक चांगली ऑफर येत आहे, जिथे आपण अ‍ॅमेझॉन पे आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड (Amazon Pay ICICI Credit Card) वापरून भाडे दिले, तर 2000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकेल. ही ऑफर 19 ऑक्टोबर ते 31 डिसेंबरपर्यंत आहे ज्यात आपल्याला दरमहा 5 टक्के कॅशबॅक (जास्तीत जास्त 350 रुपये) आणि 1 टक्के अनलिमिटेड रिवॉर्ड पॉइंट्स अ‍ॅमेझॉन पे वॉलेटमध्ये मिळतील. तथापि, क्रेड अ‍ॅपद्वारे क्रेडिट कार्डने रेंट पेमेंट केल्यावर 1.5 टक्के शुल्कदेखील भरावे लागते.

काय आहे CRED अ‍ॅप

फ्रीचार्जचे सह-संस्थापक असलेल्या कुणाल शाह यांनी सन 2018 मध्ये नवीन स्टार्टअप क्रेड (CRED) लाँच केले होते. तुम्ही जर या अ‍ॅपने तुमचे क्रेडिट कार्ड बिल भरल्यास तुम्हाला कॅशबॅक व्यतिरिक्त बरेच रिवार्ड मिळू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही जितक्या रुपयांचे क्रेडिट कार्ड बिल भराल तितके क्रेड क्वाईन तुम्हाला मिळतील आणि वेगवेगळ्या कंपनीकडून विनामूल्य किंवा डिस्काउंटेड रिवॉर्डदेखील मिळतील. उदाहरणार्थ, जर तुम्ही या अ‍ॅपद्वारे 20 हजार रुपयांचे क्रेडिट कार्ड बिल भरले तर तुम्हाला 20 हजार क्रेड क्वाॅईन मिळतील. हे रिडिम केल्यावर तुम्ही या कंपन्यांकडून बरेच रिवाॅर्ड मिळवू शकता. रेंट देण्याची सुविधाही या अ‍ॅपवर आता सुरू झाली आहे.

क्रेडिट कार्डने रेंट भरण्याचे फायदे

–  क्रेडिट लिमिटचा उपयोग करून तुम्ही कॅश वाचवू शकता. क्रेडिट कार्डची थकबाकी सहसा 45-50 दिवसांनी भरावी लागते. या मार्गाने आपण कुठेतरी रेंटचे पैसे गुंतवून थोडेफार का होईना उत्पन्न मिळवू शकता.

–  तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे केलेले व्यवहार ईएमआयमध्ये रूपांतरित करू शकता. याचा अर्थ असा की तुम्ही ईएमआयद्वारेदेखील रेंट परतफेड करू शकता.

–  क्रेडिट कार्डवर कॅशबॅक किंवा रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात.