फेस्टिव्हल ऑफर ! फक्त 2,999 मध्ये घरी घेऊन जा 95 Km ऍव्हरेज देणारी बाईक

पोलीसनामा ऑनलाईन : टीव्हीएस मोटरने या दिवाळीत आपल्या ग्राहकांसाठी काही खास ऑफर आणल्या आहेत. कंपनीने आपल्या लोकप्रिय बाइक्सवर कमी डाउन पेमेंट आणि सूट देण्याची ऑफर दिली आहे. आम्ही याठिकाणी तुम्हाला या सर्व ऑफरबद्दल आणि त्यांचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेबद्दल आपल्याला सांगत आहोत.

२,९९९ रुपयांमध्ये मिळवा टीव्हीएस स्पोर्ट :
जर आपले बजेट कमी असेल आणि आपण परवडणारी बाइक शोधत असाल तर टीव्हीएस स्पोर्ट आपल्यासाठी योग्य बाईक आहे. दिल्लीमध्ये या बाईकची किंमत ३९ हजार रुपयांपासून सुरू होते. या बाईकवर सर्वात कमी डाउन पेमेंट २,९९९ रुपये देण्यात येत आहेत. या व्यतिरिक्त शून्य प्रक्रिया शुल्क आणि १५,००० रुपयांची सूटदेखील देण्यात येत आहे.या बाईकमध्ये सध्या अडीच लाख ग्राहक आहेत. या बाइकमध्ये १०० सीसीचे इंजिन आहे.

टीव्हीएस स्टार सिटी प्लस ७,५५५ रुपयांमध्ये मिळवा :
११० सीसी इंजिनसह स्टार सिटी प्लस ५३,००० रुपयांपासून सुरू होते. आपण ते खरेदी करू इच्छित असल्यास ७,५५५ च्या कमीतकमी डाउन पेमेंटची ऑफर आहे. म्हणजेच, फक्त ७,५५५ रुपये देऊन आपण ही बाईक आपल्या घरी घेऊन जाऊ शकता. उर्वरित रक्कम आपण ईएमआयमध्ये देऊ शकता. या व्यतिरिक्त कंपनी ३.९९ टक्के व्याज दर आणि शून्य प्रक्रिया शुल्काची ऑफर देत आहे. याशिवाय या बाईकच्या खरेदीवर ९००० रुपयांची सूट मिळू शकते, तर रोख पैसे घेणारे ग्राहकही २००० रुपयांची स्वतंत्र बचत करतील.

४४४४ रुपयांमध्ये मिळणार अपाचे आरआर ३१० :
याशिवाय कंपनीने आपल्या प्रीमियम बाईक अपाचेवर ४४४४ रुपये इतके कमी डाऊन पेमेंट करण्याची ऑफरही दिली आहे. या बाईकची किंमत २.२८ लाख रुपये आहे. याशिवाय रॅडियनवर (Radeon) ५,९९९ रुपये आणि व्हिक्टरवर ७,९९९ रुपये डाऊन पेमेन्ट दिले जात आहे. या सर्व ऑफरबद्दल अधिक माहितीसाठी आपण कंपनीच्या शोरूमशी संपर्क साधू शकता.

Visit : Policenama.com 

You might also like