Indian Railways : 28 फेब्रुवारी पर्यंत IRCTC देतीय 2000 रुपयांची ‘कॅशबॅक’, फक्त करावं लागेल ‘हे’ काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देणार्‍या भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) कडून ग्राहकांना आयमुद्रा (iMudra) अ‍ॅपची सुविधा दिली जाते. या अ‍ॅपमध्ये ग्राहकांना एक डिजिटल कार्ड मिळते, जे पेमेंट आणि ऑनलाइन शॉपिंगसाठी वापरले जाते. आयआरसीटीसी आजकाल ग्राहकांना IRCTC iMudra VISA/ RuPay कार्डवर 2000 रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर करीत आहे. आयआरसीटीसीने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

आयआरसीटीसी आयमुद्रा (IRCTC iMudra) ने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ग्राहकांनी त्यांच्या आवडत्या IRCTC iMudra अ‍ॅपवर VISA/ RuPay कार्ड वापरुन पैसे भरावे आणि 5000 रुपयांपेक्षा अधिक खर्च केल्यावर 2000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवावा. ही ऑफर 28 फेब्रुवारीपर्यंत वैध आहे.

फेडरल बँकेच्या सोबत मिळून केले होते लाँच

आयआरसीटीसीने फेडरल बँकेच्या सोबत मिळून हे कार्ड लाँच केले होते. भारतीय वेबसाइटवर खरेदी, पैसे हस्तांतरण आणि एटीएममधून पैसे काढण्यासाठी देखील आयमुद्रा व्हिसा कार्डचा वापर केला जाऊ शकतो.

भारतीय वेबसाइटवर खरेदीसाठी वापरले जाऊ शकते

तुम्ही केवळ भारतीय वेबसाइटवरच खरेदी करण्यासाठी तुमचे iMudra व्हिसा कार्ड वापरू शकता. तसेच याद्वारे खरेदी केवळ भारतीय चलनातच झाली पाहिजे.

तुम्ही पैसे कसे अ‍ॅड करू शकता?

तुम्ही तुमच्या आयआरसीटीसी आयमुद्रा वॉलेटमध्ये पैसे अ‍ॅड करण्यासाठी डेबिट कार्ड, यूपीआय किंवा क्रेडिट कार्डचा वापर करू शकता. पैसे अ‍ॅड करण्यासाठी तुम्हाला तुमच्या iMudra अ‍ॅपवरील अ‍ॅड मनी ऑप्शनवर क्लिक करावे लागेल आणि नंतर आपल्याला रक्कम निवडावी लागेल आणि ती तुमच्या वॉलेटमध्ये लोड करण्यासाठी पुढे सरकावे लागेल.

मिळतात या सुविधा

या अ‍ॅपद्वारे तुम्ही पाण्याचे बिलही भरू शकता. याशिवाय ऑनलाईन आणि ऑफलाईन शॉपिंगसह तुम्ही मित्र आणि कुटुंबीयांना पैसेही पाठवू शकता. तुम्ही या सुविधेद्वारे एटीएममधून पैसे देखील काढू शकता, परंतु त्यासाठी आयआरसीटीसी मुद्रा वर साइन-अप करणे आवश्यक आहे. या अ‍ॅपमध्ये वापरकर्त्यांना टॅप अँड पे (Tap & Pay) ची सुविधा मिळते.