कोण आहे अनुराग कश्यपवर लैंगिक अत्याचाराचे आरोप करणारी पायल घोष, ऋषी कपूरच्या सिनेमात केलं होतं काम

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. पायलने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे पंतप्रधानांना न्यायासाठी अपील केले आहे. आपल्याला धोका असल्याचेही तिने यावेळी म्हंटले आहे. अभिनेत्री पायल घोषने ट्वीट केले- ‘अनुराग कश्यपने खूप वाईट पद्धतीने माझ्यावर दबाव आणला. नरेंद्र मोदी जी कृपया अ‍ॅक्शन घ्या आणि या क्रिएटिव व्यक्तीमागील राक्षस देशाला पाहू द्या. मला माहित आहे की, यामुळे माझे नुकसान होऊ शकते. माझी सुरक्षा धोक्यात आहे कृपया मदत करा. या ट्विटनंतर सर्वत्र याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, जाणून घेऊया कोण आहे पायल घोष?

पायल घोष ही एक अभिनेत्री आहे, जिने दक्षिण आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2017 मध्ये ऋषी कपूर यांच्या ‘पटेल कि पंजाबी शादी ’ या चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. कोलकाता येथे राहणारी पायल तिथल्या सेंट पॉल मिशन स्कूलमध्ये शिकली आहे. त्याच वेळी तिने कोलकाताच्या स्कॉटिश चर्च कॉलेजमधून पदवी संपादन केली. ती सध्या मुंबईत राहते. वयाच्या 17 व्या वर्षी पायल घोषने बीबीसी टेलिफिल्म शार्पच्या पेरिलमध्ये काम केले. या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी ती एका मित्राबरोबर गेली आणि तिची निवड झाली. इंग्रजी सैनिक रिचर्ड शार्प यांच्यावरील या चित्रपटात पायलने गावात राहणार्‍या बंगालच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलीची भूमिका साकारली होती. पायलने कॅनेडियन चित्रपटात देखील काम केले होते, ज्यामध्ये ती एक शाळेची मुलगी बनली होती. ही मुलगी तिच्या शेजारच्या नोकराच्या प्रेमात पडते.

पायलच्या आई-वडिलांनी इच्छा नव्हती कि, तिने अभिनय क्षेत्रात काम करावे. म्हणून ती कॉलेजच्या सुट्यांमध्ये कोलकाताहून मुंबईला पळून गेली होती. यानंतर ती मुंबईच्या किशोर अभिनय अकादमीत दाखल झाली. त्याच वेळी तिची भेट चंद्र शेखर येलेती यांच्याशी झाली, ज्याने पायलला तेलुगू चित्रपट प्रयानममध्ये काम दिले. या चित्रपटात तिच्याबरोबर मंचू मनोजने काम केले होते. नंतर पायल घोषने ओओसारावल्ली आणि मिस्टर रास्कलसारख्या तेलगू चित्रपटात काम केले. याशिवाय त्यांनी वर्षाधारे या कन्नड चित्रपटातही काम केले आहे. 2012 मध्ये विवेक अग्निहोत्रीने पायल यांना त्यांच्या ‘फ्रीडम’ या चित्रपटात भूमिका दिली होती. चित्रपटाचे शूटिंग झाले पण तो कधीच प्रदर्शित झाला नाही.

यानंतर तिला विनोदी चित्रपट पटेल कि पंजाबी शादीमध्ये काम मिळाले. या चित्रपटातील तिचा नायक वीर दास होता. दिग्दर्शक संजय छेत यांचा हा चित्रपट 15 सप्टेंबर 2017 रोजी जगभरात प्रदर्शित झाला होता. परेश रावल, ऋषी कपूर आणि प्रेम चोप्रा यांनी यात काम केले. हा चित्रपट फारसा आवडला नाही आणि तो बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई देखील करू शकला नाही. पायल घोष यांनी चित्रपटांशिवाय टीव्हीवरील मालिक ;साथ निभाना साथिया;मध्येही काम केले आहे. यात त्याने राधिकाची भूमिका साकारली होती.

दरम्यान, पायल घोषने अनुराग कश्यपवर आरोप केल्यानंतर अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनीही ट्विट केले आहे. पायल यांनी एनसीडब्ल्यूकडे तक्रार पाठवावी असे त्यांनी लिहिले आहे. त्याचवेळी अभिनेत्री कंगना रनौत यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली असून अनुराग कश्यपच्या अटकेची मागणी केली. त्यांनतर शनिवारी रात्री उशिरा अनुराग कश्यपनेही आपली बाजू मांडली. या विषयावर अनुराग कश्यपने बरेच ट्विट केले आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे की, “क्या बात हे! इतका वेळ लागला मला शांत करण्याचा प्रयत्नात. चला काही नाही, मला गप्प करता करता इतके खोटे बोलले कि महिला असूनही दुसऱ्या महिलेलाही सोबत खेचून आणले. थोडी मर्यादा ठेवा मॅडम. फक्त एवढेच बोलेल कि जे काही आरोप आहेत ते सर्व निराधार आहेत.”

आपल्या पुढच्या ट्विटमध्ये अनुरागने लिहिले, “माझ्यावर आरोप ठेवताना, माझ्या अभिनेत्यांना आणि बच्चन कुटुंबाला एकत्र खेचणे म्हणजे संधी पाहून चौकार मारू शकला नाहीत. मॅडम दोन विवाह केले आहेत, जर तो गुन्हा असेल तर मान्य आहे आणि खूप प्रेम केले, तेही कबूल करतो. ”

आपल्या स्पष्टीकरणात अनुराग कश्यपने पुढे ट्विट केले की, माझी पहिली पत्नी असो की दुसरी पत्नी असो किंवा कोणतीही मैत्रीण असो किंवा मी काम केलेल्या बरीच अभिनेत्री असो, किंवा संपूर्ण मुली आणि महिला टीम ज्या नेहमी माझ्याबरोबर काम करता किंवा मी ज्या सर्व स्त्रियांना भेटलो ते अगदी खाजगी किंवा सार्वजनिक ठिकाणी, मी कधीही असे वागत नाही किंवा कधी कोणत्या किमतीवर हे सहन करू शकत नाही. बाकी जे काही होते ते पाहू. आपल्या व्हिडिओमध्येच दिसते कि किती सत्य आहे किती नाही, बाकी आपल्यासाठी प्रार्थना आणि प्रेम. आपल्या इंग्रजीचे उत्तर हिंदीमध्ये दिल्याबद्दल दिलगीर व्यक्त करतो.’

यानंतर एका शेवटच्या ट्वीटमध्ये अनुरागने लिहिले की, “आणखी तर बरेच हल्ले होणार आहेत. ही केवळ एक सुरुवात आहे. बरेच फोन आले आहेत, नाही म्हणू नका आणि गप्प बसा. हे देखील माहित आहे कि, कोठून- कोठून बाण सोडले जाणार आहे. फक्त प्रतीक्षा आहे. “