दिग्दर्शक अनुरागला अटक करा अन्यथा उपोषणाला बसेन, पायल घोषने दिला इशारा

पोलिसनामा ऑनलाईन – लैंगिक गैरवर्तणुकीबाबत अभिनेत्री पायल घोष हिने बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर आरोप केले आहेत. या प्रकरणी तिने पोलीस तक्रार देखील दाखल केली. मात्र पोलिसांनी अनुरागला अद्याप अटक केली नसल्यामुळे पायल संतापली आहे. जर अनुरागवर कारवाई झाली नाही तर मी उपोषण करेन, असा इशारा तिने पोलिसांना दिली आहे.

अनुराग विरोधात मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. बलात्कार, गैरवर्तन आणि चुकीचे कृत्य केल्याप्रकरणी कलम 376,354,341 आणि 342 अंतर्गत कश्यपविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी अनुरागला अद्याप अटक केलेली नाही. जर त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही तर पायल उपोषणाला बसेल. असा धमकीवजा इशारा तिच्या वकिलांनी दिला आहे. अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केले असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचे खरे रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा, असे ट्विट पायलने केले आहे. यासंदर्भात थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बास्स इतकंच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत, असे ट्विट अनुराग कश्यपने केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like