रामदास आठवले यांच्या पक्षात प्रवेश करणार पायल घोष, वकील सुद्धा घेणार RPI चे सदस्यत्व

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –   चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेता अनुराग कश्यपवर कथित लैंगिक शोषणाचा आरोप करणारी चित्रपट अभिनेत्री पायल घोष आपल्या वकिलासह केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) मध्ये सहभागी होणार आहे. याबाबतची शक्यता अनेक दिवसांपासून व्यक्त केली जात होती. मात्र, आता यास दुजोरा मिळाला आहे.

होऊ शकते महिला मोर्चाची उपाध्यक्ष

सूत्रांच्या माहितीनुसार, पायल घोषला आरपीआय महिला मोर्चाचे उपाध्यक्ष पद दिले जाऊ शकते. तर तिच्या वकिलाला सुद्धा प्रदेश उपाध्यक्ष बनवण्याची शक्यता आहे.

अनुराग कश्यपवर केला होता आरोप

पायल घोषने अनुराग कश्यपवर मी टू चा आरोप केला होता. याबाबत तिने मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. मात्र, कश्यपने हे आरोप फेटाळले आहेत.

आठवले यांनी केला होता सपोर्ट

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि आरपीआय अध्यक्ष रामदास अठावले यांनी पायल घोषचे मी टू प्रकरणात समर्थन केले होते. त्यांनी अभिनेत्रीची भेट घेतली होती. केवळ इतकेच नव्हे, तर त्यांनी पायल सोबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचीही भेट घेतली होती. जेथे पायलने आपल्या सुरक्षेची आणि न्यायाची मागणी केली होती.

You might also like