प्रियांका गांधींच्या एन्ट्रीवर पायल रोहतगीची मुक्ताफळे; पायल ट्रोलर्सच्या निशाण्यावर

नवी दिल्‍ली : पोलीसनामा ऑनलाइन – प्रियांका गांधी वढेरा यांचा राजकारणात प्रवेश सगळ्यांसाठी एक धक्काच होता. काहींना सुखद तर काहींना आश्चर्याचा. प्रियांका यांच्या राजकारणातील प्रवेशावर त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. त्यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे राजकिय वर्तुळातुन नाही तर बॉलिवुडमधूनही प्रतिक्रिया येत आहे. ‘द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’च्‍या निर्मात्‍यानंतर आता अभिनेत्री पायल रोहतगीने प्रियांका यांच्‍यावर टीका केली आहे.

पायलने ट्वीट करत प्रियांका यांच्या प्रवेशावर गंभीर टीका केली आहे. ‘लोक म्‍हणतात, पंतप्रधान बनण्‍यासाठी इंदिरा गांधी यांनी लाल बहादुर शास्त्री यांची हत्या केली. ते म्‍हणतात, इंदिरा यांनी आपला मुलगा संजय गांधी यांची हत्या केली आहे. ते म्‍हणतात, ती एक हुकूमशाही होती. प्रियांका गांधी इंदिरा यांचे दुसर रुप आहे, असं पायलने ट्वीट केलं आहे. त्यासोबतच आपणास आणखी एक हत्यारा, हुकूमशहा वा फॅसिस्ट हवाय ? रक्‍त आणि मिळताजुळता चेहरा यामुळे एकसारखे गुणही असू शकतात, अशी गंभीर टीका पायलने केली आहे.

https://twitter.com/Payal_Rohatgi/status/1088053899796205568

तसंच तिने तिच्या दुसऱ्या ट्वीटमध्ये अतंत्य वाईट ट्वीट करत, प्रियांका आणि अभिनेत्री सनी लिओनीला एकत्र उभे करा. दोघी बॉक्स ऑफिस आणि बेडरूम स्टोरीमध्ये प्रसिद्ध आहेत. दोघी मिळून आपल्या नवऱ्यांना प्रमोट करतील. तसही भारतीयांना गोरी लोक आवडतात. त्यांना मुफ्तमध्ये लैंगिक ज्ञान मिळेल, असं ट्वीट पायलने केलं आहे.

https://twitter.com/Payal_Rohatgi/status/1088059461061758976

दरम्यान, पायलच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर युजर्सनी पायलचा पानउतारा केला आहे. लोकांनी तीच्या ट्वीटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सनी लिओनीची प्रतिष्ठा तुझ्यापेक्षा चांगलीच आहे, हे तुला कोणी सांगितलं आहे का?,असे काही प्रश्न ट्रोलर्सनी केले आहेत.

https://twitter.com/daromat_bolo/status/1088056630493827072

https://twitter.com/AnthonySald/status/1088133620232007680