#Video : शिवरायांबद्दलच्या ‘त्या’ आक्षेपार्ह ट्विटबाबत अभिनेत्री पायल रोहतगीनं मागितली माफी, म्हणाली…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्यावर आता अभिनेत्री पायल रोहतगीने जाहीरपणे माफी मागितली आहे. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला असंही तिनं म्हटलं आहे.

शिवाजी महाराज हे मूळ क्षत्रिय कुळाचे नाहीत, तर त्यांचा जन्म एका शूद्र जातीच्या शेतकरी कुटुंबात झाला होता’ असं विधान तिनं केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर सडकून टीका करण्यात आली. हे सगळं प्रकरण चिघळण्यापूर्वी ती माफी मागून मोकळी झाली आहे.

म्हणे भारतात स्वातंत्र्यच नाही

तिनं एक व्हिडिओ शेअर करत तिची बाजू मांडली आहे. ‘मी विचारलेला साधा-सरळ प्रश्न कोणाला समजलाच नाही. त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मला केवळ शिवाजी महाराजांबद्दल जाणून घ्यायचे होते. पण ज्यांना असं वाटलं की मी त्यांच्या महाराजांबद्दल काही चुकीचं बोलले तर मी त्या सगळ्यांची माफी मागते. मी तुमच्या महाराजांबद्दल काही गोष्टी वाचल्या. केवळ मला त्याविषयी खात्री करून घ्यायची होती. पण, माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी मला लक्ष्य करण्यात आलं. मला कोणालाही प्रश्न विचारण्याचा अधिकारचं नाही, भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्यच अस्तित्वात नाही हे मला आज समजलं’ असंही ती म्हणाली.

दोन दिवसांपूर्वी १ जूनला पायलने ट्विटरच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोखाली तिने “शिवाजी महाराज हे मूळ क्षत्रिय कुळाचे नाहीत. त्यांचा जन्म एका क्षुद्र जातीच्या शेतकरी कुटुंबात झाला आहे”, असे या ट्विटमध्ये म्हंटल आहे. ट्विटर आणि इनस्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे. या वादग्रस्त ट्वीट आणि व्हिडिओनंतर पायलच्या कुटुंबियांना धमक्याचे फोन आणि तिला ट्वीटवर ट्रोल करण्यात आले. पायलने यापूर्वी नथुराम गोडसे, सतीप्रथा आणि सनातन संस्था यांच्याबद्दल वादग्रस्त विधाने केली आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like