Payal Rohatgi | बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीला अटक; जाणून घ्या प्रकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – वादग्रस्त व्हिडिओ आणि विधानामुळे सतत चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीला (Payal Rohatgi) अहमदाबाद पोलिसांनी (Ahmedabad Police) अटक (arrest) केली आहे. शेजाऱ्यांना धमकी देण्याच्या आरोपात पोलिसांनी तिला अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पायलने राहत्या सोसायटीमधील रहिवाशांना अश्लील भाषेत धमक्या दिल्या आहत. तसेच त्यांना खोट्या आरोपांखाली तुरुंगात डांबण्याची धमकीही दिली आहे. शिवाय सोसायटीच्या आवारात जी मुलं खेळताना दिसतील त्यांचे हात पाय तोडेन असे देखील तिने म्हटल्याचे आरोप तिच्यावर लावण्यात आले आहेत. आरोपाप्रकरणी अहमदाबाद पोलिसांनी तिला अटक केली आहे.

यापूर्वीही झाली आहे अटक
दरम्यान पायलला अटक करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी राजस्थान पोलिसांनी तिला अटक केली होती. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांचे वडील आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष मोतीलाल नेहरू (Motilal Nehru) यांच्याविषयीचा एक व्हिडीओ पायलने तयार केला होता. या व्हिडीओमध्ये तिने नेहरूवर खोटे आरोप केले होते. या प्रकरणातून तिची पूर्ण सूटका झालेली नाही. दरम्यान आता तिने आणखी एक वाद अंगावर ओढवून घेतला आहे.

Web Title :- payal rohatgi arrested by ahmedabad city police

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Paranjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक

पुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर ED चा ‘छापा’; 100 कोटीच्या वसुली प्रकरणाचा सुरुय तपास

2800 रुपयांचे जेवण ऑर्डर केले आणि 12 लाख रु. टिप दिली, वेटरने सांगितली ‘त्या’ मिस्ट्री मॅनची पूर्ण कथा

आदर्श ! जमशेदजी टाटा 100 वर्षात जगातील सर्वात मोठे ‘दानशूर’